लेकीनं असं काय केलं की, Manoj Bajpayee म्हणाले 'माझ्यासाठी हे लज्जास्पद'

Manoj Bajpayee Daughter : बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी हे सध्या त्यांच्या ‘एक बंदा काफी है’ या चित्रपटासाठी चर्चेत आहेत. मनोज बाजपेयी हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. मनोज बाजपेयी ही नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसतात. तर मनोज बाजपेयी यांची हिंदी किती अप्रतिम आहे हे देखील सांगायची गरज नाही. सध्या ‘एक बंदा काफी है’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या मनोज बाजपेयी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या मुलीला हिंदी येत नाही आणि त्याची त्यांना खूप जास्त लाज वाटते याविषयी सांगितलं आहे. 

मनोज बाजपेयी यांनी नुकतीच जेनिस सिकेराला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मनोज बाजपेयी यांनी त्यांच्या मुलीविषयी सांगितलं आहे. मनोज बाजपेयी यांनी सांगितलं की त्यांचे चित्रपट पाहता त्यांची मुलगी देखील हिंदी शिकेल असे तिच्या शिक्षिकेला वाटले होते. पण तिला हिंदी येत नाही यानं त्यांना खूप वाईट वाटलं होतं. त्याविषयी सविस्तर सांगत मनोज बाजपेयी म्हणाले की "अवा पहिल्यांदा बागी 2 च्या निमित्तानं माझ्या सेटवर आली होती. अहमद खाननं तिचे स्वागत केले, तिनं एका सीनसाठी अॅक्शन देखील म्हटलं. सेटवर तिचे खूप लाड करण्यात आले. ती माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आली आणि म्हणाली टायगर कुठे आहे? तिला हिंदी वगैरे येत नाही किंवा शिकत नाही पण हिंदी चित्रपटातील कलाकार मात्र तिला आवडतात."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अवाला हिंदी भाषा येत नाही त्यामुळे तिला ओरडा पडतो हे सांगत मनोज बाजपेयी पुढे म्हणाले, "ती पूर्णपणे इंग्रज आहे. तिला ओरडा पडतो तरी देखील ती हिंदी नाही बोलत. पीटीएममध्ये तिची टीचर काय म्हणाली माहितीये? मनोज जी, हे काय आहे, तुमची मुलगी माझ्या वर्गात शिकते हे कळल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. तिला हिंदी बोलत नाही. ती म्हणते की मला हिंदी येते. तर मी विचारलं की तुझ्या वडिलांचं नाव काय ते सांगं. तर ती म्हणाली मेरा पापा… तिचं हे बोलणं ऐकून मला अक्षरशः लाज वाटली.”

हेही वाचा : आईवरून शिवीगाळ करणाऱ्या नेटकऱ्याला Siddharth Jadhav नं फटकारलं, म्हणाला...

मनोज बाजपेयी यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते लवकरच 'द फॅमिली मॅन 3' या सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनपासून या सीरिजनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Manoj Bajpayee i ashamed of Daughter because she can not speak hindi
News Source: 
Home Title: 

लेकीनं असं काय केलं की, Manoj Bajpayee म्हणाले 'माझ्यासाठी हे लज्जास्पद'

लेकीनं असं काय केलं की, Manoj Bajpayee म्हणाले 'माझ्यासाठी हे लज्जास्पद'
Caption: 
(Photo Credit : Manoj Bajpayee Instagram)
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Diksha Patil
Mobile Title: 
लेकीनं असं काय केलं की, Manoj Bajpayee म्हणाले 'माझ्यासाठी हे लज्जास्पद'
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, May 29, 2023 - 13:01
Created By: 
Diksha Patil
Updated By: 
Diksha Patil
Published By: 
Diksha Patil
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
316