विनोदी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर अडकली विवाहबंधनात

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत यंदा अनेक कलाकारांचे दोनाचे चार हात झालेत. आता यामध्ये भर पडली आहे ती हसतमुख अभिनेत्री प्राजक्ता हनमघरची. 

प्राजक्ता हनमघर नुकतीच रजत धळे याच्यासोबत विवाहबध्द झाली आहे. १४ ऑगस्टला अगदी साध्या आणि सुंदर पध्दतीत हे शुभमंगल पार पडले. खास मित्र-मैत्रिणींच्या आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला असून ही नवविवाहित जोडी त्यांच्या आयुष्यातील सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

लाफ्टर क्वीनचे हास्य तिच्या लग्नांच्या फोटोसमध्ये पण पाहू शकतो. मराठमोळ्या पेहरावात प्राजक्ताचे सौंदर्य अजून खुलले आहे. या विवाहसोहळ्याला अगदी घरची माणसं उपस्थित होती. अगदी साधेपणात हा सोहळा पार पडला. कॉमेडीची GST एक्सप्रेसमध्ये आपल्याला प्राजक्ता पाहायला मिळणार आहे. 

एका लग्नाची दुसरी गोष्ट, फू बाई फू, कॉमेडीची बुलेट ट्रेन, ढाबळ, कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस या टेलिव्हिजन मालिका आणि कार्यक्रमांतून प्राजक्ताने नेहमीच प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.  विनोदी कार्यक्रमात प्राजक्ताच्या बहारदार परफॉर्मन्समुळे चार चाँद लागतात.  प्राजक्ता आणि रजतला झी २४ तासकडून खूप खूप शुभेच्छा. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Laughter Queen Prajakta Hanamghar get married with Rajat Dhale: View Pics
News Source: 
Home Title: 

विनोदी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर अडकली विवाहबंधनात

विनोदी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर अडकली विवाहबंधनात
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Dakshata Thasale