हे वागणं माणुसकीच्या विरोधातील.... किरण माने प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची मध्यस्थी
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता किरण माने हे प्रकरण वेगवेगळ्या कारणांमुळे गाजत आहे. या प्रकरणावर आता तोडगा निघणार असं दिसत आहे. या प्रकरणात आता गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यस्ती केली आहे.
अभिनेते किरण माने आणि स्टार प्रवाहचे कंटेंट हेड सतीश राजवाडे (Satish Rajwade) हे दोघेही गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Minister Jitendra Awhad) यांच्या भेटीला गेले होते. खासदार अमोल कोल्हे (NCP MP and artist Amol Kolhe) हे देखील या बैठकीदरम्यान उपस्थित होते.
या भेटीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपलं मत मांडलं असून त्यांनी म्हटलं आहे की, किरण माने प्रकरणात स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे यांच्यासोबत चर्चा केली आहे.
त्यांना विचारण्यात आलं की, किरण माने यांना याआधी नोटीस दिली होती का? एखाद्या कलाकाराला याप्रकारे बाहेर काढणं हे माणुसकीच्या विरोधातली घटना आहे, असं मला वाटतं.
चांगली मालिका बंद होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. एका कलाकाराला बाहेर काढणं योग्य नाही. मानेंच्या बाजूनं महिला कलाकारांची संख्या जास्त आहे.
सत्याची बाजू घेणाऱ्या या खऱ्या जिजाऊंच्या लेकी आहेत. किरण मानेंवर अन्याय झाल्याचं स्पष्ट होत आहे असं मत मंत्री आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, सतीश राजवाडे यांनी प्रोडक्शन हाऊस यांना घेऊन येतो असं सांगितलं आहे. या प्रकरणाला कुठेही रंग न लावता आणि कोणावरही अन्याय न होऊ देता काम केलं पाहिजे.
राजवाडेंना या प्रकरणात काहीच माहित नव्हतं असं त्यांनी सांगितलं आहे." अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
हे वागणं माणुसकीच्या विरोधातील.... किरण माने प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांची मध्यस्थी
