'या' सेलिब्रेटींशी करिनाचा आहे 36 चा आकडा... कधी एकमेकींकडे ढुंकूनही पाहात नाहीत..

Kareena Kapoor Attitude: करीना कपूर ही तिच्या अॅटिट्यूडसाठी बऱ्याचदा ट्रोल होते. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगलेली असते. करीना ही जितकी चांगली अभिनेत्री आहे तितकीच चांगलीच ती तिच्या स्वभावासाठीही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. मध्यंतरी एअरपोर्टवर करीना कपूर ही स्पॉट झाली होती. त्यावेळी एक महिला फॅन तिचा फोटो काढण्यासाठी फारच उत्सुक होती. परंतु करीना फारच अॅटिट्युड दाखवायला निघाली. ती त्या फॅनला सेल्फी तर दिला नाहीच परंतु त्याचसोबत तिच्यासोबत फारच उद्धटपणेही वागली होती. त्यामुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर फारच टीका केली होती. त्यानंतर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांनीहीदेखील करीनाच्या उद्धट स्वभावाचा दाखला दिला होता.

ते म्हणाले होते की ते लंडनहून परतताना त्यांच्याच विमानात करीना कपूर देखील होती. अनेक फॅन्स तिच्यासोबत हे फोटो काढण्यासाठी उत्सुक होते. परंतु ती मात्र त्यांना अजिबातच भाव देत नव्हती. अशावेळी नारायण मुर्तींचा सल्ला असा होता की जेव्हा कोणी आपल्यासाठी प्रेम व्यक्त करत एक फॅन म्हणून तेव्हा आपणही तितकाच ग्रॅटिट्यूट दाखवायला हवा परंतु करीनानं तसं केलं नाही. 

करीनाच्या याच स्वभावामुळे तिचा अनेकांशी 36 चा आकाडा आहे का? आपण या निष्कर्षापर्यंत पोहचू शकत नाही परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे काही सेलिब्रेटी आहेत ज्यांचा करीनाशी 36 चा आकाडा आहे. त्यामुळे सध्या त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. आपण या लेखातून जाणून घेणार आहोत की नक्की या सेलिब्रेटींचा करीनाशी नक्की कुठल्या बाबतीत छत्तीसचा आकाडा आहे. या लेखातून आपण ते सविस्तर जाणून घेणार आहोत. करीना आणि कोण आहे ते सेलिब्रेटी ज्यांचा एकमेकांशी छत्तीसचा आकाडा आहे. 

  • तुम्ही म्हणाल की असे कोण अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांच्याशी करीनाचा छत्तीसचा आकाडा आहे कारण करीना कायमच आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत फारच एन्जॉय करताना दिसते. सोबतच तिची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगलेली असते. 
  • अमृता अरोरा, मलायका अरोरा यांच्यासोबत खूपच धम्माल करताना दिसते. परंतु असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्याशी तिचे मतभेद होते आणि चक्क ती त्याचं तोंडही पाहत नाही. 
  • अमीषा पटेल हिच्याशी करीनाचे वाद होते. त्यातून 'गदर 2'च्या निमित्तानंही अमिषा पटेलनं याचा खुलासा केला होता. 'कहो ना प्यार हैं' हा अमिषा नाही तर करीना कपूरला ऑफर झाला होता. त्याचवेळी करीनानं रेफ्यूजीची निवड केली होती. सोबतच करीनानं अमिषाला वाईट अभिनेत्री म्हटलं होतं. त्यात कहो ना प्यार हैं हा हीट झाला होता. तर करीनाचा चित्रपट फ्लॉप झाला होता. 
  • बिपाशा बासूशीही तिचा 36 चा आकाडा आहे कारण त्या दोघी 'अजनबी' या चित्रपटाच्या सेटवर आले होते. तेव्हा त्यांच्यात भांडणं झाली. बिपाशाला करीना ब्लॅक कॅट म्हणाली होती.
  • असं म्हणतात की करीना आणि बॉबी देओल हे चित्रपटाची पहिली पसंद होते. त्यातून जेव्हा बॉबी देओलचं नावं करीनानं ऐकलं आणि मग त्यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. 
  • दिया मिर्झावरही तिनं कमेंट केली होती परंतु त्या दोघी एकमेकींशी फार बोलतही नाहीत. 

करीनाचा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांच्या बाबतीत फारच उतरती कळी लागली आहे असं पाहायला मिळते आहे. त्यातून मागील वर्षी तिचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट फारच चर्चेत होता. परंतु हा चित्रपट काही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. त्यामुळे याची जोरात चर्चाही रंगलेली होती. तेव्हा करीनाला आणि आमिर खानला प्रचंड ट्रोलही करण्यात आले होते. आता त्यानंतर करीनाचा जाने जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यावेळी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
kareena kapoors biggest enemies in the bollywood industry for her attitude
News Source: 
Home Title: 

'या' सेलिब्रेटींशी करिनाचा आहे 36 चा आकडा... कधी एकमेकींकडे ढुंकूनही पाहात नाहीत..

 

'या' सेलिब्रेटींशी करिनाचा आहे 36 चा आकडा... कधी एकमेकींकडे ढुंकूनही पाहात नाहीत..
Caption: 
kareena kapoors biggest enemies in the bollywood industry for her attitude
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
गायत्री हसबनीस
Mobile Title: 
'या' सेलिब्रेटींशी करिनाचा आहे 36 चा आकडा... कधी एकमेकींकडे ढुंकूनही पाहात नाहीत..
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, October 2, 2023 - 14:46
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
456