जॅकलीन फर्नांडीसचा पोल योगा भलताच होतोय व्हायरल
मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस सोशल मीडियावर सध्या भलतीच चर्चा आहे. तिचे पोल वर योगा करताने हॉट फोटो हे या चर्चेचे कारण ठरले आहेत.
जॅकलीनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पोल योगा करताना दिसत आहे. जॅकलीनाने हा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर रविवारी (19 नोव्हेंबर) शेअर केला आहे. आतापर्यंत हा फोटो 17 हजार यूजर्सनी लाईक केला आहे. दरम्यान, जॅकलीनाने जो फोटो शेअर केला आहे त्या फोटोत जॅकलीना हात न लावता पोलवर योगास्थितीत बसलेली दिसते. तिचा हा फोटो पाहून यूजर्सने अनेक प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकांनी तर हा फोटो पाहून तिला रामदेवबाबांचे गुरूच म्हटले आहे. तर, अनेकांनीच तिच्या फिटनेसचे कौतूक केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नर्गिसनेही जॅकलीनच्या फोटोवर कमेंट केली आहे. ती म्हणते 'हा पोल तुझ्या घरात आहे काय? मीही येत आहे.' तर, एक यूजर म्हणतो 'तू बाबा रामदेव यांची बहीण आहेस काय?' दूसरा युजर म्हणतो जॅकलीन आपल्या चाहत्यांसाठी कधीतरी उत्तरही देत जा.
‘Yogini’ with @lanaroxy ⭐️ https://t.co/sQCtfbIjDO pic.twitter.com/JJbJ7co5SW
— Jacqueline Fernandez (@Asli_Jacqueline) November 19, 2017
दरम्यान, या फोटोनंतर जॅकलीने पोल डान्स करतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडिओ 'अ जंटलमन' चित्रपटाच्या आगोदर तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोल डान्सचा सराव करत असताना हा व्हिडिओ तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.
जॅकलीन फर्नांडीसचा पोल योगा भलताच होतोय व्हायरल
