'एक सांगायचय' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

मुंबई : अभिनेता केके मेननचं मराठीतलं पदार्पण, अभिनेता लोकेश विजय गुप्तेचं दिग्दर्शकीय पदार्पण म्हणून 'एक सांगायचंय.......Unsaid Harmony हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे.देवी सातेरी प्रॉडक्शननं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर झाला. या ट्रेलरमधून आताच्या तरूणपिढीचे प्रश्न मांडताना दिसत आहे.  नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे.

लोकेश विजय गुप्तेंन या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्यासह चित्रपटात पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी  आदींच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचं गीतलेखन जितेंद्र जोशी, संगीत दिग्दर्शन शैलेंद्र बर्वेनं केलं आहे. ऑस्कर विजेत्या रेसूल पुकुट्टीनं चित्रपटाच्या ध्वनी आरेखनाची जबाबदारी सांभाळली आहे, तर पुष्पांक गावडेनं सिनेमॅटोग्राफी केली असून चैत्राली लोकेश गुप्तेने वेशभूषाकार म्हणून काम पाहिले आहे.अवधूत 

गुप्ते, बेला शेंडे, तुषार जोशी, विवेक नाईक, आरती केळकर, राशी हरमळकर यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे.सिनेमाची कथा मला जेव्हा ऐकवली तेव्हाच ती मला आवडली आणि अवघ्या वीस मिनिटात मी होकार दिला.महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते. या सिनेमासाठी मी खास मराठी शिकलो आणि त्यासाठी मला लोकेशची फार मदत झाली असे अभिनेता के.के.मेनन यांनी सांगितले. केके मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्या तगड्या अभिनयाची जुगलबंदी असलेला हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. येत्या १६ नोव्हेंबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Ek Sangaychay - Unsaid Harmony marathi movie trailer released
News Source: 
Home Title: 

'एक सांगायचय' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

'एक सांगायचय' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Dakshata Thasale
Mobile Title: 
'एक सांगायचय' सिनेमाचा ट्रेलर रिलीज
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, October 12, 2018 - 12:16