'आमची सीता अशी नाही,' बिकिनीमधील फोटोंमुळे मृणाल ठाकूर ट्रोल

Mrunal Thakur Trolled over Bikini: मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवत आहे. छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरचे बॉलिवूडसह दक्षिणेतही प्रचंड चाहते आहेत. मृणाल ठाकूर सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच अॅक्टिव्ह असून आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो पोस्ट करत असते. फोटो पोस्ट करताना सोशल मीडियावर ती नेहमीच बिनधास्तपणे वावरत असते. नुकतेच तिने आपल्या सुट्ट्यांमधील काही फोटो शेअर केले आहेत. 

मृणाल ठाकूरने समुद्रकिनारी सुट्टी घालवतानाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधील फोटोंमध्ये तिने बिकिनी घातल्याचं दिसत आहे. दरम्यान मृणाल ठाकूरचा हा बोल्ड फोटो पाहून तिचे चाहते मात्र नाराजी व्यक्त करत आहेत. 

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर वावरताना कोणताही पडदा ठेवत नाही. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक बोल्ड आणि बिनधास्त फोटो पाहायला मिळत असतात. दरम्यान या फोटोंवरुन टीका झाली तरी मृणाल त्यावर फार व्यक्त होत नाही. 4 एप्रिलला मृणालने बीचवर सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती निळ्या रंगाच्या बिकीनीत दिसत आहे. दरम्यान, हे फोटो पाहून तिचे काही चाहते नाराज झाले आहेत. 

मृणाल ठाकूरने फोटो पोस्ट केल्यानंतर तिच्या काही चाहत्यांनी त्यावर कमेंट केल्या अशून सीतारमन चित्रपटाचा दाखला दिला आहे. चित्रपटामध्ये मृणाल ठाकूर पारंपारिक वेशभूषेत दाखवण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी आमची सीता अशी नाही असं म्हटलं आहे. तर काहींनी बिकिनीमध्ये पाहण्याची इच्छा नसलेल्या अभिनेत्रींपैकी मृणाल ठाकूर एक आहे अशी कमेंट केली आहे. 

मृणाल ठाकूर Nani 30 चित्रपटाचा भाग असणार आहे. नुकताच हैदराबादमध्ये या चित्रपटाचा मुहूर्त झाला. या चित्रपटासाठी मृणाल ठाकूर फार उत्सुक आहे. "मी नानीसोबत हा चित्रपट करत आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट फार सुंदर असून मी या चित्रपटाशी जोडले आहे याचा अभिमान आहे. हा दिग्दर्शक शौर्युवचा पहिलाच चित्रपट आहे. मला ही भूमिका मिळाली याचा प्रचंड आनंद आहे. जर मी सीतेची भूमिका केली नसती तर हा चित्रपट मिळाला नसता," असं मृणालने सांगितलं आहे. 

"सीता या भूमिकेने एक ठसा उमटवला आहे. आजही जेव्हा दिग्दर्शक माझ्याशी संवाद साधतात किंवा मी त्यांनी तुमच्यासोबत काम करण्यास इच्छुक असल्याचं सांगते तेव्हा ते मला थोडं थांबा, सीतेच्या भूमिकेइतकी चांगली भूमिका नाही आहे असं सांगतात. त्यामुळे मला चांगल्या स्क्रिप्टच ऑफर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो," असं मृणाल सांगते. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Bollywood Actress Mrunal Thakur trolled by netizens for posing in bikini
News Source: 
Home Title: 

'आमची सीता अशी नाही,' बिकिनीमधील फोटोंमुळे मृणाल ठाकूर ट्रोल

 

'आमची सीता अशी नाही,' बिकिनीमधील फोटोंमुळे मृणाल ठाकूर ट्रोल
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
'आमची सीता अशी नाही,' बिकिनीमधील फोटोंमुळे मृणाल ठाकूर ट्रोल
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, April 5, 2023 - 13:31
Created By: 
Shivraj Yadav
Updated By: 
Shivraj Yadav
Published By: 
Shivraj Yadav
Request Count: 
1
Is Breaking News: 
No