अंकिताच्या bachelorette partyची घाई, अभिनेत्री पोहचली पायाला प्लास्टर असताना
मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मंगळवारी रात्री उशिरा अंकिताने लग्नाआधी तिच्या मैत्रिणींसाठी बॅचलर पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अंकिता लोखंडेच्या सगळ्या मैत्रिणींनी धमाल मस्ती केली. दरम्यान, पार्टीत पोहोचलेली अभिनेत्री सृष्टी रोडेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
पायाला दुखापत झाल्यानंतरही सृष्टी रोडेने अंकिता लोखंडेच्या बॅचलर पार्टीला हजेरी लावल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सृष्टी रोडेचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांना असा विश्वास आहे की, सृष्टीला पार्टी खूप आवडते आणि ती या स्थितीत अंकिताच्या पार्टीला पोहोचली तर ती देखील अंकिताची खूप खास मैत्रीण असल्याचं स्पष्ट होतं.
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये, सृष्टी रोडेला पार्टीमध्ये पोहोचण्यासाठी ज्या पायऱ्या चढून जावं लागतं ते पायाला दुखापत झाल्यामुळे ती या पायऱ्या चढू शकली नाही, हे तुम्ही पाहू शकता. अशा स्थितीत तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सृष्टी रोडेला आपल्या कडेवर उचलून वरच्या मजल्यावर नेलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
यासोबतच, आम्ही तुम्हाला सांगतो की, अंकिता लोखंडेच्या बॅचलर पार्टीमध्ये तिच्या मैत्रिणी आणि फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित सेलिब्रिटीज जबरदस्त पद्धतीने सहभागी होण्यासाठी पोहोचले होते. सर्वाधिक चर्चा अंकिता लोखंडेच्या लूकमुळेच होत आहेत. तिच्या बॅचलर पार्टीमध्ये अंकिता एकदम मस्त स्टाईलमध्ये दिसली.
12 डिसेंबरला अंकिता तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न करणार असल्याचं वृत्त आहे आणि या लग्नासाठी तिची जोरदार तयारी सुरू आहे. हे दोघंही मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळे पाहुण्यांसाठी तिथे काही रुम्सही बुक करण्यात आल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, अंकिता आणि विकीच्या लग्नाचा हा फंक्शन १२ डिसेंबरपासून तीन दिवस चालणार आहे, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत आणि त्यापैकी एक नाव बादशाहचं आहे.
अंकिताच्या bachelorette partyची घाई, अभिनेत्री पोहचली पायाला प्लास्टर असताना
