प्रेग्नंसीमधला आलिया भट्टचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल; पाहा व्हिडीओ
मुंबई : सध्या बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत लग्नानंतरची पहिली प्रेग्नेंसी एन्जॉय करत आहे. आनंदाची बातमी दिल्यानंतर आलियाने लंडनमध्ये तिच्या 'हार्ट ऑफ स्टोन' या हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आणि त्यानंतर ती भारतात परतली. आलिया आता विश्रांती घेईल आणि रणबीर कपूरसोबतचा तिचा गर्भावस्थेचा टप्पा संस्मरणीय करेल असं सर्वांना वाटलं होतं, पण याउलट आलिया अजूनही शूटिंगमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे.
शूटिंग सेटवर झाली स्पॉट
अलीकडेच आलिया भट्टला मुंबईत पापाराझींनी स्पॉट केलं होतं. यादरम्यान ती शूटिंगसाठी घराबाहेर पडली होती. खरंतर, आलियाने तिचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'च्या शूटिंगला सुरुवात केली होती. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत आलिया भट्ट दिसणार आहे. या काळातील फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यावेळी अभिनेत्री आपला सैल कपड्यांमध्ये बेबी बंप लपवताना दिसली होती.
'डार्लिंग्स' प्रमोशन
एवढंच नाही तर आलिया भट्टने तिच्या 'डार्लिंग्स' चित्रपटाचं प्रमोशनही सुरू केलं आहे. यावेळी आलिया फ्लोरल प्रिंट वन पीस ड्रेसमध्ये अतिशय क्यूट स्टाईलमध्ये दिसली. आलिया भट्टच्या प्रेग्नेंसी ग्लोची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे आणि चाहते अभिनेत्रीचे फोटो खूप लाइक आणि शेअर करत आहेत.
प्रेग्नंसी अनाऊंसमेंट
जून 2022 मध्ये आलियाने तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली. तिने दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आलिया आणि रणबीर सोनोग्राफी करताना दिसले होते.
प्रेग्नंसीमधला आलिया भट्टचा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल; पाहा व्हिडीओ
