आलिया भट्ट @26, 19व्या वर्षात केलं चित्रपटसृष्टीत पदार्पण

मुंबई : वयाच्या 19व्या वर्षी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवणारी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या अभिनयाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2012 साली 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून आलियाने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटानंतर आलियाच्या यशाच्या आलेख वरच चढत गेला आहे.  आज आलिया तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. आलियाने तिच्या जवळच्या मित्रपरिवारासह वाढदिवस साजरा केला. 

 
 
 
 

A post shared by Mahesh Bhatt (@maheshfilm) on

2012 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर'  चित्रपटात काम करण्याआधी आलियाने बालकलाकार म्हणूनही काम केलं होतं. मुंबईतील जमनाबाई नरसी शाळेतून आलियाने तिचं शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. 'स्टुडंट ऑफ द इयर'च्या ऑडिशनवेळी आलिया 17 वर्षांची होती. आलियाने 1999 साली 'संघर्ष' चित्रपटात प्रिती झिंटाच्या लहानपणीचा रोल केला होता. विविध चित्रपटातून आलियाने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. 'हायवे', 'उडता पंजाब' या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी आलियाला फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला आहे. 

आलिया सध्या अभिनेता रणबीर कपूरसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. आलियाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गली बॉय' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या चित्रपटातील आलियाच्या भूमिकेलाही अनेकांनी पसंती दिली. सध्या आलिया तिच्या आगामी 'कलंक' चित्रपटामध्ये व्यस्त आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
alia bhatt celebrate her 26th birthday
News Source: 
Home Title: 

आलिया भट्ट @26, 19व्या वर्षात केलं चित्रपटसृष्टीत पदार्पण 

आलिया भट्ट @26, 19व्या वर्षात केलं चित्रपटसृष्टीत पदार्पण
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
आलिया भट्ट @26, 19व्या वर्षात केलं चित्रपटसृष्टीत पदार्पण
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, March 15, 2019 - 09:10