PHOTO : अजय देवगनसोबत अनिल कपूर - माधुरी दीक्षितची 'टोटल धमाल'

मुंबई : अजय देवगन, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, जावेद जाफरी यांसारखे कलाकार मोठ्या पडद्यावर एकाच फ्रेममध्ये दिसत असतील तर अर्थाततच प्रेक्षकही 'टोटल धमाल' अनुभवतीच ना! हो... अजय देवगनच्या बहुप्रतिक्षित 'टोटल धमाल'चं नवं पोस्टर समोर आलंय... आणि या पोस्टरवरील चेहरे पाहून अनेक प्रेक्षकांच्या मनात या सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झालीय. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी एक कॉमेडी सिनेमा लवकरच समोर येतोय, असं म्हणायला काही हरकत नाही. 

काही वेळेपूर्वीच अजयनं या सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित केलंय. या पोस्टरवर संपूर्ण स्टारकास्ट एकत्र दिसतेय. या पोस्टरवर जंगलात फसलेल्या या कलाकारांच्या मागे जंगलातील प्राण्यांचे आकारही दिसत आहेत. सोबतच अजयनं या सिनेमाच्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केलीय. येत्या २१ जानेवारी रोजी म्हणजेच सोमवारी 'टोटल धमाल'चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. 

टोटल धमाल
टोटल धमाल

कॉमेडी सिनेमाच्या चाहत्यांसाठी ही एक पर्वणीच ठरेल. या पोस्टवर मस्तीखोर अंदाजात अजय देवगन, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, जॉनी लिवर, अर्शद वारसी, जावेद जाफरी, रितेश देशमुख आणि संजय मिश्रा दिसत आहेत.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
ajay devgn starrer total dhamaals new poster trailer will be out on 21 january 2019
News Source: 
Home Title: 

PHOTO : अजय देवगनसोबत अनिल कपूर - माधुरी दीक्षितची 'टोटल धमाल'

PHOTO : अजय देवगनसोबत अनिल कपूर - माधुरी दीक्षितची 'टोटल धमाल'
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
PHOTO : अजय देवगनसोबत अनिल कपूर - माधुरी दीक्षितची 'टोटल धमाल'
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, January 18, 2019 - 14:27