ऐश्वर्या करणार १००० मुलांना अन्नदान...

ठाणे : काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्याने आपला ४४ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त 'मिड-डे मील' कार्यक्रमांतर्गत १००० मुलांच्या जेवणाचा खर्च करणार आहे. अन्नमित्र फाऊंडेशनतर्फे मिड-डे मील हा कार्यक्रम चालवला जातो. या फाऊंडेशनची स्थापना अन्नमित्र फाऊंडेशन इंटरनेशनल सोसाईटी आॅफ कृष्णा कांनशसनेसतर्फे करण्यात आली आहे. 

इस्कॉनचे आध्यात्मिक गुरू राधानाथ स्वामी महाराज यांनी सांगितले के, "अन्नमित्रतर्फे चालवण्यात येणारी  'मिड-डे मील' योजनेंतर्गत महाराष्ट्रातील २००० हून अधिक विद्यालयात पौष्टिक मिड डे भोजन दिले जाते."

त्याचबरोबर ते म्हणाले की, "ही योजना २००४ पासून सुरु झाली आहे. मात्र तेव्हा याचे स्वरूप अत्यंत लहान होते. त्यामध्ये केवळ ९०० लोकांना जेवण मिळत होते. आता याचे स्वरूप विस्तारले असून देशातील ७ राज्यातील १० लाखाहून अधिक मुलांना याचा लाभ मिळतो."

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
aishwarya ray donates free meal for 1000 students
News Source: 
Home Title: 

ऐश्वर्या करणार १००० मुलांना अन्नदान...

ऐश्वर्या करणार १००० मुलांना अन्नदान...
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

वाढदिवसानिमित्त अन्नदान 

'मिड-डे मील' योजना 

न्नमित्र फाऊंडेशनतर्फे मिड-डे मील हा कार्यक्रम चालवला जातो

Authored By: 
Darshana Pawar