Raanbaazaar ट्रेलर | SEX WORKER दुसरीला म्हणतेय, ''किस से डरने का नही, यहाँ पे सब धंदाईच करते है''

मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमुळे मराठी सिनेसृष्टीत नक्कीच हादरा बसेल हे नक्की.

दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांनाच्या भेटीला येत आहेत. पानसे यांच्या 'रानबाजार' या वेबसिरीजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा टीझर पाहून मराठी सिनेसृष्टीतला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड टीझर असल्याचं स्पष्ट होत आहे. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजचा नुकताच ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या अवघ्या काही वेळातच या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे.

'रानबाजार' या सीरिजचा ट्रेलर प्लॅनेट मराठी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरनंतर प्राजक्ता आणि तेजस्विनीची जोरदार चर्चा सुरुये. याच बरोबर अभिनेत्री उर्मिला कोठारेचा लूकही या ट्रेलरमधून समोर आला आहे. प्राजक्ता आणि तेजस्वीनीच्या लूकनंतर उर्मिलाही बोल्ड भूमिकेत दिसणार आहे का याकडे सध्या प्रेक्षकांच लक्ष लागलंय. जर उर्मिलाने या सिनेमात बोल्ड भूमिका साकरली तर उर्मिलाचा हा पहिलाच बोल्ड सिनेमा असेल.

या वेबसिरीजमध्ये  प्राजक्ता माळीसह तेजस्विनी पंडितही आव्हानात्मक भूमिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या वेबसिरीजची प्रतीक्षा आहे. ही मराठी इंडस्ट्रीतील आजवरची सर्वात बोल्ड वेबसिरीज ठरेल असं बोललं जातंय.

राजकिय, क्राईम विषयावर आधारीत असलेल्या या वेब सिरिजमधील कलाकारांची तगडी फौज बघायला मिळतेय. तेजस्विनी आणि प्राजक्ता यांच्यासह उर्मिला कोठारे, माधुरी पवार, सचिन खेडेकर, मोहन आगाशे, मकरंद अनासपुरे, अभिजीत पानसे यांच्या महत्त्वाच्या भूमिका या सिरीजमध्ये आहेत. ही वेब सिरिज येत्या 20 मेपासून प्लॅनेट मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
After the discussion of Prajakta mali bold look now the trailer of Ranbazar webseries has arrived
News Source: 
Home Title: 

Raanbaazaar ट्रेलर | SEX WORKER दुसरीला म्हणतेय, ''किस से डरने का नही'...

Raanbaazaar ट्रेलर | SEX WORKER दुसरीला म्हणतेय, ''किस से डरने का नही, यहाँ पे सब धंदाईच करते है''
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Raanbaazaar ट्रेलर | SEX WORKER दुसरीला म्हणतेय, ''किस से डरने का नही'...
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, May 18, 2022 - 17:37
Request Count: 
1
Is Breaking News: 
No