'मी मालिका सोडली?'... अभिनेत्री उर्मिला कोठारेचं वक्तव्य चर्चेत

मुंबई : मराठीतील प्रसिद्ध  कपल आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानिटकर कोठारे ही जोडी नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी चर्चा आहे ती म्हणजे उर्मिला कोठारेची. उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे या जोडीनं २०११ मध्ये सप्तपदी घेतली. मात्र काही दिवसांपुर्वी उर्मिला-आदिनाथमध्ये काही तरी बिनसलंय. या बातमीने जोर धरला होता. पण आमच्याशी बोलताना या सगळ्या अफवा आहेत असं सांगत या बातमीवरुन आदिनाथने मौन तोडलं होत.

लग्नानंतर उर्मिलाने  इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतला. घरचं प्रॉडक्शन हाऊन असूनही ती अभिनयापासून लांब राहिली. मात्र अचानक उर्मिलाने छोट्या पडद्यावर पुनरागमन करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.  'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून महत्वाच्या भूमिकेत ती दिसू लागली.  

यानंतर चर्चा रंगली ती म्हणजे घरचं प्रॉडक्शन हाऊस असताना इतक्या वर्षांनी उर्मिला दुसऱ्या प्रॉडक्शन हाऊसच्या मालिकेतून पुर्नपदार्पण का करतेय?  या सगळ्या चर्चांनी इतका जोर धरला की बास रे बास... ही चर्चा संपता-संपत नाही तोवर उर्मिलाने या मालिकेतून ब्रेक घेतल्याची चर्चाही जोरदार रंगू लागलीये. ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

पण यामागचं सत्य काही वेगळच आहे. कारण या सगळ्यावर मौन तोडत उर्मिलाने एक व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलाय. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उर्मिला म्हणालीये की, ''नमस्कार मी उर्मिला कोठारे, तुझेच मी गीत गात आहे. या मालिकेत  मी वैदैहीची भूमिका साकारत आहे. सध्या या मालिकेत माझा मृत्यू दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे खूप चर्चा सुरुये. खूप अफवा पसरतायेत. की मी ही मालिका सोडली आहे. काय झालं असेल, हे झालं असेल, ते झालं असेल!. 

त्यामुळे मला तुम्हाला सांगायला आवडेल की, ओरिजनल गोष्टींमध्ये एका महिन्यानंतर वैदैहीचा मृत्यू हा लेखकाने लिहीलेला होता. आणि त्या प्रमाणेच गोष्ट चाललेली आहे. आणि मी अजिबात मालिका सोडलेली नाहीये. तर मी विनंती करते ज्या लोकांना प्रश्न पडलेले आहेत . काहीजण उगीजच अफवा पसरवत आहेत. काही वेबसाईट्सना मनापासून कळकळीची विनंती करते की असं करु नका.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फॅक्ट हे आहे की, अजूनही या मालिकेत मी आहे. आणि स्वराच्या आठवणीत मी तुम्हाला दिसत राहाणारेय. याचबरोबर हा व्हिडिओ पोस्ट करत उर्मिलाने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की,  ''तुझेच मी गीत गात आहे' ही स्टार प्रवाह वरील मालिका मी सोडलेली नाहिये.. स्वराच्या आठवणीत मी तुम्हा सर्वांना या पुढे ही दिसत राहणार आहे ...'' त्यामुळे हे स्पष्ट होतं की, उर्मिलाने मालिका सोडली नाहीये. या मालिकेतून ती दिसत राहणारेय.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Actress Urmila Kothare exit this serial Tujhech mi geet gaat aahe
News Source: 
Home Title: 

'मी मालिका सोडली?'... अभिनेत्री उर्मिला कोठारेचं वक्तव्य चर्चेत

  'मी मालिका सोडली?'... अभिनेत्री उर्मिला कोठारेचं वक्तव्य चर्चेत
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
'मी मालिका सोडली?'... अभिनेत्री उर्मिला कोठारेचं वक्तव्य चर्चेत
Publish Later: 
No
Publish At: 
Saturday, June 4, 2022 - 16:57
Request Count: 
1
Is Breaking News: 
No