टॅट्टू दाखवण्याच्या नादात अभिनेत्री टॉपलेस; पाहून भांबावून जाल
मुंबई : सहसा कलाकार मंडळी सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं कायमच चाहत्यांशी एक वेगळं नातं जपताना दिसतात. अशा या कलाकारांच्या यादीमध्ये बऱ्याच नावांचा समावेश आहे. चाहत्यांनी असणारं हेच नातं जपताना आता म्हणजे एका अभिनेत्रीनं तिचा टॉपलेस लूक सर्वांच्या समोर आणला आहे.
डाव्या खांद्य़ावर तिनं हा टॅट्टू काढला असून, तो दाखवत एक फोटो पोस्ट करताना तिनं सर्वांच्याच नजरा वळवल्य़ा आहेत. तिचा हा फोटो सर्वांसाठीच अनपेक्षित आहे. पण, तरीही ज्य़ा सुरेख पद्धतीनं तिनं हा टॅट्टू हाताळला आहे आणि सर्वांसमोर आणला आहे, हे पाहता सर्वच स्तरांतून तिची प्रशंसाही केली जात आहे.
आपला टॅट्टू फ्लाँट करणारी ही अभिनेत्री एका सुपरस्टारची लेक आहे. जी तिच्या चित्रपटांसोबतच बोल्ड अंदाजासाठीही ओळखली जाते. ही अभिनेत्री म्हणजे श्रृती हसन. अभिनेत्री असण्यासोबतच श्रुती एक उत्तम गायिकाही आहे. तिनं नुकताच शेअर केलल्या फोटोमध्ये कृष्णधवल छटांमध्येही श्रुतीचं सौंदर्य खुलून आल्याचं पाहायला मिळत आहे.
श्रुतीनं गोंदवलेला हा टॅट्टू म्हणजे तामिळ भाषेतील तिचं नाव आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलंय, माझं नाव बोला... जोरात बोला.... श्रुतीच्या या फोटोला अनेक लाईक्स मिळाले असून, यावर कमेंट करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
टॅट्टू दाखवण्याच्या नादात अभिनेत्री टॉपलेस; पाहून भांबावून जाल
