मलायकापेक्षाही अरबाजच्या गर्लफ्रेंडची 'या' बाबतीत सरशी

मुंबई : मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. वयाचा आकडा वाढत असतानाही मलायकाच्या (Malaika) मादक अदा आणि तिचं दिवसागणिक आणखीच लक्षवेधी होत जाणारं सौंदर्य म्हणजे शब्दांतही व्यक्त करता येण्यापलीकडलं. 

मलायका तिच्या फिटनेसप्रमाणंच तिच्या Tattoo मुळेही ओळखली जाते. विविध कारणांसाठी विविध अर्थ असणारे टॅट्टू तिनं आपल्या शरीरावर काढून घेतले आहेत. पण, आता तिच्या याच टॅट्टूंना टक्कर देतेय ती म्हणजे मलायकाच्याच पूर्वाश्रमीच्या पतीची म्हणजेच एक्स हसबंडची गर्लफ्रेंड जॉर्जिया आंद्रियानी (giorgia andriani ). 

जॉर्जियाचे हल्लीच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, जिथे ती शरीरावरील टॅट्टू फ्लाँट करताना दिसली. एकिकडे जॉर्जिया तिच्या टॅट्टूंसाठी चर्चेत असतानाच मलायकाच्या शरीरावरील टॅट्टूंचे अर्थ चाहत्यांची मनं जिंकत आहेत. तिच्या कमरेवर असणाऱा पक्ष्यांचा टॅट्टू हा आयुष्य एखाद्या पक्ष्याप्रमाणं स्वच्छंदी असावं आणि कोणत्याही माणसाला आकाशात झेप घेता पाहिजे याचं प्रतिक आहे. 

मलायकानं तिच्या हातावर लव्ह असं लिहिलेला टॅट्टू काढून घेतला आहे. तर, आंद्रियानं तिच्या पायाच्या वरच्या भागात अर्थात मांडीवर एक रंगीत टॅट्टू काढला आहे. हा टॅट्टू फ्लाँट करताना ती बऱ्याचदा दिसते. 

मलायकाच्या मनगटावर आणखी एक टॅट्टू आहे, जिथं तिनं तिच्या मुलाची जन्मतारीख गोंदवून घेतल्याचं म्हटलं जात आहे. सेलिब्रिटी आणि त्यांचे हे टॅट्टू कायमच चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच मलायकाला आता अरबाजचीच गर्लफ्रेंड टॅट्टूच्या बाबतीतही टक्कर देतेय असं म्हणायला हरकत नाही. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
actor director arbaaz-khan-girlfriend-georgia-andriani-tattoo-vs-ex-wife-malaika-arora-tattoos-pictures
News Source: 
Home Title: 

मलायकापेक्षाही अरबाजच्या गर्लफ्रेंडची 'या' बाबतीत सरशी 

 

मलायकापेक्षाही अरबाजच्या गर्लफ्रेंडची 'या' बाबतीत सरशी
Caption: 
छाया सौजन्य- सोशल मीडिया
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
मलायकापेक्षाही अरबाजच्या गर्लफ्रेंडची 'या' बाबतीत सरशी
Publish Later: 
No
Publish At: 
Monday, August 23, 2021 - 17:35
Created By: 
Sayali Patil
Updated By: 
Sayali Patil
Published By: 
Sayali Patil
Request Count: 
1
Is Breaking News: 
No