हिमस्खलनाचा धडकी भरवणारा Video कॅमेरात कैद; पाहूनच उडेल थरकाप
काठमांडू : निसर्ग त्याच्या अगाध लीलांनी जितका आपल्याला अवाक् करत असतो, तितकाच तो आपल्या रौद्र रुपानं धडकीही भरवत असतो. अशाच या निसर्गाचं एक रुप नुकतंच नेपाळमध्ये पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर या रुपाची झलक दाखवणारा एक व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. जो पाहून अनेकांचाच थरकाप उडाला. रविवारी नेपाळमध्ये अतिप्रचंड रौद्र असं हिमस्खलन झालं.
प्राथमिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये जवळपास 9 जणांचा मृत्यू झाला तर, काहीजण जखमीही झाले.
पोलीस दलाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तुकुचे पर्वतावर झालेल्या या हिमस्खलनाने देशातील उत्तर- पश्मिमेकडील मस्तांग जिल्ह्याला सर्वाधिक प्रभावित केलं.
हिमस्खलनामध्ये 150 हून अधिक गाई बेपत्ता झाल्याचं कळत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. जिथे पर्वतीय भागामध्ये हिमस्खलनामुळे जणू काही बर्फात पाण्याच्या लाटाच उसळत आहेत अशीच परिस्थिती उदभवती आणि क्षणार्धातच होत्याचं नव्हतं झालं.
हिमस्खलनाचा धडकी भरवणारा Video कॅमेरात कैद; पाहूनच उडेल थरकाप
