सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी व्यक्त केली हत्येची भीती! काय आहे कारण?

Mohammed bin Salman : सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या आजूबाजूला नेहमी कडेकोट सुरक्षा असते. मात्र, आता मोहम्मद बिन सलमान यांना जीव गमवावा लागण्याची भीती वाटत आहे. याचे कारण आहे की, त्यांनी इस्त्रायली राजवटीसोबत राज्याचे संबंध सामान्य केले. अमेरिकन न्यूज आउटलेट पॉलिटिकोने एक अहवाल प्रकाशित केला आहे. ज्यामध्ये राजघराण्याने अमेरिकन खासदारांशी नुकत्याच झालेल्या संभाषणाचा हवाला देऊन ही बाब उघड केली आहे. 

सौदी अरेबियाने राजपुत्र  मोहम्मद बिन सलमान यांनी अमेरिकन काँग्रेसच्या खासदारांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. जर आपण इस्रायलशी हातमिळवणी केली तर धोका वाढेल. ज्यामध्ये इस्रायलसोबत सौदी अरेबियाचे संबंध सामान्य करणे देखील समाविष्ट आहे.  मोहम्मद बिन सलमान यांनी इजिप्तचे नेते अनवर सादात यांच्यासारख्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

सौदी आणि इस्रायलमध्ये मैत्री होईल का?

या अहवालात असे म्हटले आहे की, सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांची या निर्णयावर नाराजी आहे. इस्रायली सरकार करारामध्ये पॅलेस्टिनी राज्यासाठी मार्ग तयार करण्यास तयार नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, गाझावरील इस्रायलच्या हल्ल्यादरम्यान, सौदी अरेबियाने अमेरिकेला सांगितले की, इस्रायलशी कोणतेही राजनैतिक संबंध राहणार नाहीत. 

जोपर्यंत इस्रायल 1967 च्या सीमा असलेल्या स्वतंत्र पॅलेस्टिनी राज्याला मान्यता देत नाही. यापूर्वी, व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले होते की बिडेन प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे की सौदी अरेबिया आणि इस्रायल सामान्यीकरणावर बोलण्यास इच्छुक आहेत. 

अमेरिकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

किमान एका प्रसंगी, इस्रायलशी शांतता करार केल्यानंतर मारला गेलेला इजिप्शियन नेता अनवर सादात यांचा संदर्भ देत त्याने विचारले सादातच्चा संरक्षणासाठी अमेरिकेने काय केले? 2020 मध्ये, युनायटेड अरब अमिराती, बहारीन, सुदान आणि मोरोक्को यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने राजवटीत सामंजस्य करार केले. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Prince Mohammed bin Salman of Saudi Arabia expressed fear of assassination
Home Title: 

सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी व्यक्त केली हत्येची भीती! काय आहे कारण? 

सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी व्यक्त केली हत्येची भीती! काय आहे कारण?
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Soneshwar Patil
Mobile Title: 
सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी व्यक्त केली हत्येची भीती!
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, August 16, 2024 - 17:49
Created By: 
Soneshvar Patil
Updated By: 
Soneshvar Patil
Published By: 
Soneshvar Patil
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
239