वायग्राचा ओव्हरडोज, एअरपोर्टवर कपडे काढून त्याचा धिंगाणा

थायलंड : वायग्रा घेण्याचे जसे काही फायदे सांगितले जातात तसेच त्याचे काही तोटेही आहेत. अधिक प्रमाणात वायग्रा घेणं किती महागात पडू शकतं याचं एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. जास्त वायग्रा घेतल्याने एका व्यक्तीने थायलंड एअरपोर्टवर धिंगाणा घातला. 

ओव्हरडोजचा कारनामा

ही घटना ४ जानेवारीची असून वायग्राचा डोज जास्त झाल्याने एक व्यक्ती एअरपोर्ट्वर आपले कपडे काढून धावू लागला आणि एकच गोंधळ उडाला. व्यक्ती इतक्यावरच थांबला नाहीतर त्याने केलेली घाण तो एअरपोर्टवरील स्टाफ आणि प्रवाशांकडे फेकत होता. 

असा झाला सगळा गोंधळ

'न्यूयॉर्क पोस्ट'नुसार, २७ वर्षीय स्टीव चो अमेरिकेच्या न्यूयॉर्कचा राहणारा आहे. स्टीव दक्षिण कोरियाच्या फ्लाइटची वाट बघत होता. तेव्हा एअरपोर्टच्या डिपार्चर हॉलमध्ये त्याने त्याचे अंगावरील असले नसलेले सगळे कपडे काढले आणि धावत सुटला. दरम्यान, या व्यक्तीने एअरपोर्टवरील दुकानांचे नुकसानही केले. शेवटी एअरपोर्ट स्टाफमधील ६ गार्डनी त्याला पकडले आणि नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. 

त्याने मागितली माफी

स्टीवने पोलिसांना माहिती दिली की, त्याने जास्त प्रमाणात सेक्स ड्रग्स घेतली होती. नंतर त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. इतकेच नाहीतर स्टीवने त्याच्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचेही कबूल केले. एअरपोर्टकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने मान्य केलंय की, त्याने जास्त प्रमाणात वायग्रा घेतली होती’.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
man-takes-too-much-viagra-goes-on-naked-airport-rampage
News Source: 
Home Title: 

वायग्राचा ओव्हरडोज, एअरपोर्टवर कपडे काढून त्याचा धिंगाणा

वायग्राचा ओव्हरडोज, एअरपोर्टवर कपडे काढून त्याचा धिंगाणा
Caption: 
Image Credit : The Sun
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

वायग्राचा ओव्हरडोज, एअरपोर्टवर कपडे काढून धिंगाणा

वायग्राचा जास्त डोज घेतल्याची त्याने दिली कबूली

एका व्यक्तीने थायलंड एअरपोर्टवर धिंगाणा घातला