कुलभूषण जाधव २५ डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटणार : पाकिस्तानी मीडिया
इस्लामाबाद : कथित गुप्तहेराच्या आरोपीखाली पाकिस्तानाती तुरुंगात कैद असलेला भारतीय नौसेनेचा माजी कमांडर कुलभूषण जाधव हे येत्या २५ डिसेंबरला पत्नी आणि आईची भेट घेतील. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैजल यांनीही ही बातमी खरं असल्याचं सांगितलं. पाकिस्तानच्या परवानगीनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाधव यांच्या पत्नी आणि आईला याबाबत माहिती दिली.
सुषमा स्वराज यांचं ट्विट
पाकिस्तानच्या ‘जियो न्यूज’ नुसार, मोहम्मद फैजल यांनी साप्ताहिक प्रेस ब्रीफिंग दरम्यान सांगितले की, या भेटीदरम्यान भारतीय दूतावासाचे अधिकारीही उपस्थित असतील. सुषमा स्वराज यांनी ट्विट करून सांगितले की, ‘पाकिस्तान सरकार म्हणाले की, ते कुलभूषणची आई आणि पत्नीला व्हिजा देतील. मी कुलभूषणची आई अवंतिका जाधव यांच्याशी बोलले आहे आणि त्यांना याबाबत माहिती दिली आहे’.
आधी केवळ पत्नीला व्हिजा
सुषमा स्वराज म्हणाल्या की, याआधी पाकिस्तान केवळ कुलभूषण जाधवच्या पत्नीला व्हिजा देण्यासाठी तयार होतं. यावर आम्ही जाधव यांच्या आईंना सुद्धा व्हिजा देण्याची मागणी केली. तसेच आम्ही जाधवची आई आणि पत्नी यांच्या पाकिस्तानातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती’.
याआधी पाकिस्तान सरकारने गेल्या महिन्यात कुलभूषण जाधव यांना पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. पाकिस्तानने मानवतेच्या आधारावर हा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण यांना आईला सुद्धा भेटण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती.
कुलभूषण जाधव २५ डिसेंबरला आई आणि पत्नीला भेटणार : पाकिस्तानी मीडिया

कुलभूषण जाधवला आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी
२५ डिसेंबरला कुलभूषण जाधव भेटणार आई आणि पत्नीला
भेटीदरम्या भारतीय दुतावासाचे अधिकारी असतील उपस्थित