'फर्स्ट लेडीज' सन्मानाने ऐश्वर्या रायचा गौरव

नवी दिल्ली : ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील एक अग्रगण्य नावांपैकी एक आहे.

गेली 20 वर्ष ऐश्वर्या विविध प्रोजेक्ट्स,सिनेमांमधून रसिकांसमोर आली आहे. नुकताच ऐश्वर्याचा 'फर्स्ट लेडीज' या सन्मानाने गौरव करण्यात आला आहे. 

राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान  

दिल्लीमध्ये महिला व बाल कल्याण मंत्रालयाकडून विविध क्षेत्रामध्ये काम करणार्‍या 112 महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये ऐश्वर्या रायचाही समावेश आहे.या कार्यक्रमामध्ये महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनीही सहभाग घेतला होता. 

ऐश्वर्याचा खास अंदाज 

ऐश्वर्या राय अनेकदा भारतीय पेहरावात दिसते. या कार्यक्रमामध्येही ऐश्वर्या क्रीम आणि लाल रंगाच्या साडीत खुलून दिसत होती. सध्या ऐश्वर्या फन्ने खा चित्रपटामध्ये व्यस्त आहे.  

विजेत्या महिलांची यादी 

ऐश्वर्या रायसह या यादीमध्ये अनेक कर्तबगार महिलांचा समावेश आहे. मंजू ( हमाल), छवि रजावत  ( सरपंच),  हर्षिनी कन्हेकर, सुनालिनी मेनन (आशियातील पहिली महिला कॉफी टेस्टर), शतभी बसू (पहिली महिला बार टेंडर) अशा महिलांचा यामध्ये समावेश होता.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Actress Aishwarya Rai Bachchan gets first lady award
News Source: 
Home Title: 

'फर्स्ट लेडीज' सन्मानाने ऐश्वर्या रायचा गौरव

'फर्स्ट लेडीज' सन्मानाने ऐश्वर्या रायचा गौरव
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Highlights: 

ऐश्वर्या राय सह 112 महिलांंचा गौरव  

राष्ट्रपतींच्या हस्ते ऐश्वर्याचा सन्मान  

अवॉर्ड सोहळ्याला महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनीही सहभाग घेतला