ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने मिळतील आरोग्यदायी फायदे

Feb 23,2025

पोषक तत्वे

ग्रीन टी मध्ये व्हिटामिन A, D, E मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच फायबर, आयरन, मॅग्निज यांसारखी अनेक पोषक तत्वेदेखील आढळतात.

ग्रीन टी आणि मध

मध हा पदार्थ अनेक आरोग्यदायी पोषक तत्वांनी भरपूर आहे. ग्रीन टीमध्ये मध मिसळून खाणे आरोग्यसाठी अतिशय उपयुक्त ठरेल.

तणावापासून सुटका

ताणतणावापासून दूर राहण्यासाठी ग्रीन टीमध्ये मध घालून पिणे उपयुक्त ठरते. कारण यामध्ये अँटी-डिसप्रेंट हा गुणधर्म असतो.

मरुमांसाठी रामबाण उपाय

अनेकांना चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येतात. अशावेळी मधासोबत ग्रीन टी घ्या. हे दोन्ही पदार्थ त्वचेला आतून स्वच्छ बनवतात.

रोगप्रतिकारक शक्ती

बदलत्या वातावरणामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. म्हणून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ग्रीन टी आणि मध प्या.

सर्दी-खोकला

जर तुम्हाला वारंवार खोकल्याचा किंवा घश्यातील वेदनांचा त्रास होत असेल, तरी तुम्ही ग्रीन टी आणि मधाचे सेवन करू शकता.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story