बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक खास ओळख निर्माण केलीय.
या दिग्गाजांच्या मेहनतीसोबतच त्यांना त्यांच्या नशिबावरदेखील खूप विश्वास आहे. प्रत्येकाचे कोणते ना कोणते लक्की चार्म आहे.
बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानचा लक्की चार्म त्याच्या हातातील फिरोजाच्या खड्यांचे ब्रेसलेट आहे.
लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील तिच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये लक्की चार्म असल्याचे सांगते. तिचा लक्की चार्म गणपती बप्पा आहे.
90च्या दशकातील अभिनेत्री काजोलचासुद्धा लक्की चार्मवर विश्वास आहे. तिच्या हातातील एका ओमच्या अंगठीला ती लक्की चार्म मानते.
अभिनेता रणबीर कपूरचा अंकांवर खूप विश्वास आहे. त्याचा लक्की चार्म आठ हा नंबर आहे. त्याच्या कारचा नंबर असो किंवा जर्सी नंबर, या सगळ्यांवर आठ हा अंक पाहायला मिळतो.
विक्की कौशलने एका मुलाखतीत त्याचा लक्की चार्मचा खुलासा केला होता. त्याने सांगितले की, जेव्हापासून केटरिना त्याच्या आयुष्यात आली आहे, तेव्हापासून त्याचं नशिब चमकलं.