काय म्हणायचं आता? वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न

प्रथमेश तावडे, झी मीडिया, वसई : वाहतूक नियमांचे उल्लघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस कडक कारवाई करत असतात. यावरुन वाहतूक पोलिस तसेच वाहन चालकांमध्ये वाद झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतात. बऱ्याचदा हे वाद शिवागाळ आणि हाणामारी पर्यंत पोहचतात. वसईत मात्र, अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुचाकी चालाकाचे हे कृत्य पाहून सगळ्यांनीच डोक्याला हात लावला आहे. 

वसईत वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून संतप्त झालेल्या एका दुचाकीस्वाराने भर रस्त्यात दुचाकी पेटवून दिली. वसईच्या गोखीवरे नाक्यावर ही घटना घडली आहे. पोलिसांनी या चालकाला अडवल्याने मठा अनर्थ टळला आहे. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. 

वसई वाहतूक पोलीस विभागातील पोलीस सचिन मोहने सोमवारी संध्याकाळी गोखिवरे येथील नाक्यावर वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी एक मोटारसायकल तपासणीसाठी अडवली असता दुचाकीस्वार भानूप्रताप पांडे याच्या मोटारसायकलीचे पीयूसी नव्हते, तसेच विमा संपला होता. तसेच मोटारसायकलीचा क्रमांक भपकेदार (फॅन्सी) होता. 

मोहने यांनी दंड भरत नसल्याचे त्याची दुचाकी जप्त केली. त्यामुळे आरोपी पांडे याने वाद घातला. काही वेळाने तो परत आला आणि त्याने मोटारसायकलीची पेट्रोलची टाकी उघडून ती पेटवून दिली. मोहणे यांनी नागरिकांच्या मदतीने आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.

वालीव पोलिसांनी आरोपी भानूप्रसाद पांडे याला सरकारी कामात अडथळा आणणे (३५३) तसेच दुसर्‍याच्या जिवातीस धोका उत्पन्न करणे (४४०) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई

बदलापूर शहरातील फेरीवाल्यांवर पालिका प्रशासनानं कारवाई केली. त्यामुळं रेल्वे स्टेशन परिसरानं मोकळा श्वास घेतला. मनसेनं अल्टिमेटम दिल्यांनतर फेरीवाल्यांना कारवाईची नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर सुद्धा आज काही फेरीवाल्यांनी आपली दुकानं थाटली होती. मात्र सकाळी मनसेनं स्टेशन परिसरात जोरदार घोषणाबाजी करत पुन्हा एकदा खळखट्याकचा इशारा पालिका प्रशासनाला दिला. त्यामुळं तातडीनं पालिकेनं फेरीवाल्यांवर कारवाई केली. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेनं केली होती. मात्र त्यानंतरही पालिकेनं कारवाई न केल्यानं मनसेनं पालिकेला ३० एप्रिल पर्यंत अल्टीमेटम दिला होता. मनसेच्या अल्टिमेटम नंतर पालिकेनं स्टेशन परिसरात फेरीवाल्यांसाठी नोटीस बजावली होती. या कारवाईत स्टेशन पाडा परिसरातील अनधिकृत दुकानदार आणि फेरीवाले हटवण्यात आले आहेत. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
As the traffic police took action in Vasai, there was an attempt to set fire to the bike on the road
News Source: 
Home Title: 

काय म्हणायचं आता?  वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न

काय म्हणायचं आता?  वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
वनिता कांबळे
Mobile Title: 
वाहतूक पोलिसाने कारवाई केली म्हणून भर रस्त्यात बाईक पेटवण्याचा प्रयत्न
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, May 2, 2023 - 23:52
Created By: 
Vanita Kamble
Updated By: 
Vanita Kamble
Published By: 
Vanita Kamble
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
298