जिओच्या १४९ च्या प्लानमध्येही मिळणार अनलिमिटेड डाटा
नवी दिल्ली : ग्राहकांना परवडणारी व्हॉईस आणि डेटा प्लॅन पुरवणाऱ्या रिलायन्स जिओने आपल्या योजनेत पुन्हा बदल केले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने गेल्या एका वर्षात अनेक अनेक प्लान लॉंच केले तर काही प्लानमध्ये बदल केले. उत्सवाचा विचार करून ३१ ऑक्टोबरपर्यंत JioFi डिव्हाइसवर ऑफर देऊ केली होती. यानंतर, जियोपासूनच्या टेरिफ प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. कंपनीने १४९ प्लानमध्ये सर्वात मोठा बदल केला आहे.
नवीन योजनेअंतर्गत १४९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी ४ जी इंटरनेट, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस आणि जिओ अॅप्स मेंबरशिपही देण्यात येणार आहे. या प्लॅनच्या अंतर्गत २ जीबी डेटा संपल्यानंतर देखील आपली इंटरनेट सेवा सुरूच राहणार आहे. तसेच हे इंटरनेट स्पीड ४ जीपासून कमी होऊन ६४ केबीपीएसपर्यंत होईल तरीही इंटरनेटचा वापर करता येणार आहे. जुन्या १४९ रुपयांचा डेटा प्लान संपल्यानंतर तर कोणताही डेटा दिला जात नव्हता. कंपनीच्या अन्य प्लानमध्ये असलेली ही सुविधा रु. १४९ च्या प्लानमध्ये नव्हती. जिओच्या इतर प्लानमध्ये निर्धआरित डाटा संपल्यावर १२८ केबीपीएस स्पीड मिळतो.
कॉलिंग फक्त ३०० मिनिटं
जे ग्राहक अनलिमिटेड कॉलिंगचा गैरफायदा घेत आहेत, त्यांच्यासाठीच ३०० मिनिटाचं लिमिट ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक दिवसासाठी हे ३०० मिनिटाचं लिमिट असणार आहे. जिओचं कार्ड वापरून अनेक जण दिवसाला १० तासांपेक्षा जास्त बोलत आहेत. यामध्ये मार्केटिंग आणि प्रमोशनल कॉलचाही वापर होत आहे. जिओचा हा गैरवापर रोखण्यासाठी अशा ग्राहकांना ३०० मिनीटंच फ्री देण्यात येणार आहेत. फ्री कॉलिंगची सुविधा ही फक्त वैयक्तिक वापरासाठी आहे. त्याचा व्यावसायिक वापर होत असेल तर अशा ग्राहकांवर ३०० मिनिटाचं लिमिट जिओ टाकणार आहे.
जिओच्या १४९ च्या प्लानमध्येही मिळणार अनलिमिटेड डाटा

सुविधा रु. १४९ च्या प्लानमध्ये नव्हती.
नेट स्पीड ४ जीपासून कमी होऊन ६४ केबीपीएसपर्यंत
डेटा संपल्यानंतरही इंटरनेट सेवा सुरूच