हिरो मोटोकॉर्पने लाँच केलं स्प्लेंडरचं आणखी एक व्हेरियंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Hero Super Splendor Canvas Black Edition Launch: देशात एकापेक्षा एक सरस अशा टू व्हीलर असून या सेंगमेंटला सर्वाधिक मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या बाइकपासून महागड्या क्रुझर बाइक लाँच केल्या आहेत. आता हिरो मोटोकॉर्पने लोकप्रिय 125 सीसी कम्यूटर सुपर स्प्लेंडर बाइकचं नवं व्हेरियंट लाँच केलं आहे. या मॉडेलचं नाव 2022 हिरो सुपर स्प्लेंडर कॅनव्हॉस ब्लॅक असं आहे.  या गाडीची डिझाईन इतर व्हेरियंटसारखी असून किंमत 77,430 रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे. बाइकच्या 3 डी ब्रांडिंग आणि एच-लोगोमध्ये छोटासा बदल करण्यात आला आहे. तसेच बाइक 60-68 किमी दरम्यान मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. या टू व्हीलरमध्ये काही नवे फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. यात डिजिटल अनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि एक यूएसबी चार्जर आहे.

सुपर स्प्लेंडर कॅनव्हॉस ब्लॅकमध्ये तेच 125 सीसी, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड, FI इंजिन आहे.  हे इंजिन 7,500 आरपीएमवर 10.7 बीएचपी पॉवर आणि 6,000 आरपीएमवर 10.6 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5 स्पीड गिअरबॉक्स दिलं आहे. फ्यूल एफिशिएंसीत 13 टक्के वाढ झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

हिरो मोटोकॉर्पचे प्रोडक्ट प्लानिंग प्रमुख मालो ले मॅसन यांनी सांगितलं की, 'स्प्लेंडर फॅमिली देशातील लोकप्रिय आणि विश्वास असलेला मोटारसायकल ब्रँड आहे. कॅनव्हॉस ब्लॅक एडिशनला सुपर स्प्लेंडर 125 च्या प्रीमियम यात महत्त्वाची भूमिका बजावेल. स्टायलिश आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून हे मॉडेल अजून अद्यावयत झालं आहे.'

हिरो मोटोकॉर्पचे सीजीओ रंजीवजीत सिंह यांनी सांगितलं की, 'कॅनव्हॉस ब्लॅक व्हेरियंट ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. गाडीचं प्रदर्शन चांगलं असून आरामदायी आहे.'

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Hero Super Splendor Canvas Black Edition Launch Know Feature And Price
News Source: 
Home Title: 

हिरो मोटोकॉर्पने लाँच केलं स्प्लेंडरचं आणखी एक व्हेरियंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

 

हिरो मोटोकॉर्पने लाँच केलं स्प्लेंडरचं आणखी एक व्हेरियंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Yes
No
Section: 
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
हिरो मोटोकॉर्पने लाँच केलं स्प्लेंडरचं व्हेरियंट, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, July 26, 2022 - 12:20
Request Count: 
1
Is Breaking News: 
No