Vijaya Ekadashi 2023 : विजया एकादशीनिमित्त करा चंदनाचा उपाय, पर्स नेहमी पैशांनी राहिल भरून

Vijaya Ekadashi 2023 upay in marathi : आज विजया एकादशी...हिंदू पंचागनुसार एकादशीचा उपवास दोन दिवसांचा असते.  पहिला दिवस गृहस्थांचा आणि दुसरा दिवस वैष्णवांचा असतो. आज विजया एकादशीचं व्रत पाळणे स्मार्टा समुदाय आणि कुटुंबातील सदस्यांसाठी सर्वोत्तम ठरणार आहे. इतर दिवशी वैष्णव पंथाचे लोक उपवास ठेवतील. गृहस्थांनी उद्या सकाळी 08:01 ते 09:18 पर्यंत विजया एकादशीचं व्रत पाळावं. असं मानलं जातं की विजया एकादशीला चंदनाचे काही खास उपाय केल्यास इच्छापूर्ती होते.  प्रत्येक कामात यश प्राप्त होतं आणि धनसंपत्ती लाभते. (Vijaya Ekadashi 2023 sandalwood or Chandan remedy or upay wallet will always be full of money in marathi)

विजया एकादशी व्रताचा उपाय (Vijaya Ekadashi Upay)

विजया एकादशीला शुभ मुहूर्तावर पिवळे चंदन आणि केशरमध्ये गुलाबपाणी मिसळून भगवान विष्णूला तिलक लावा. नंतर या चंदनाने कपाळावर टिका लावा. असा विश्वास आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी चंदनाचा टिळा लावून घराबाहेर पडल्यास त्यात नक्कीच यश मिळतं. पर्स नेहमी पैशांनी भरलेली राहते. सूर्य आणि गुरु यांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होते. 

पैसा हातात टिकत नाही  (Ekadashi Money Upay)

जर तुम्ही आर्थिक समस्यांमुळे त्रस्त असाल आणि कमवलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर विजया एकादशीच्या दिवशी सुपारीच्या पानावर कुंकुमने श्री लिहून श्रीहरीला अर्पण करा. भगवान विष्णूची विधिवत पूजा करा आणि नंतर लाल कपड्यात सुपारीचे पान गुंडाळून संपत्तीच्या ठिकाणी ठेवा. यामुळे पैशाची कमतरता भासत नाही असं मानलं जातं. 

पती-पत्नीचं नातं मधुर राहण्यासाठी उपाय 

वैवाहिक जीवनात तणाव असेल, पती-पत्नीमध्ये भांडण होत असेल, विचारांमध्ये मतभेद असतील तर विजया एकादशीच्या दिवशी पितळी पात्रात गंगेचं पाणी टाकून त्यात हळद, पिवळे चंदन आणि तुळशीची पाने टाकावीत. . यानंतर घरभर पाणी शिंपडावे. अगदी प्रत्येक कोपऱ्यात, असं मानलं जातं की यामुळे घरगुती त्रास दूर होईल आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल.

शत्रूच्या अडथळ्यापासून मुक्ती मिळेल

विजया एकादशीचे व्रत शत्रूवर विजय मिळवून देतो. या दिवशी श्री हरीची पूजा केल्यानंतर एक नारळ थोडासा कापून त्यात नारळाची पावडर आणि तूप मिसळून नारळ झाकून जमिनीत गाडावे, अशी श्रद्धा आहे. एखादे ठिकाण निवडा जेथे मुंग्याचं घर आहे. मुंग्या जसे नारळ खातात त्याप्रमाणे शत्रूचा अडथळा संपतो, असं मानलं जातं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Vijaya Ekadashi 2023 sandalwood or Chandan remedy or upay wallet will always be full of money in marathi
News Source: 
Home Title: 

विजया एकादशीनिमित्त करा चंदनाचा उपाय, पर्स नेहमी पैशांनी राहिल भरून

Vijaya Ekadashi 2023 : विजया एकादशीनिमित्त करा चंदनाचा उपाय, पर्स नेहमी पैशांनी राहिल भरून
Caption: 
Vijaya Ekadashi 2023 sandalwood or Chandan remedy or upay wallet will always be full of money in marathi
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
विजया एकादशीनिमित्त करा चंदनाचा उपाय, पर्स नेहमी पैशांनी राहिल भरून
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, February 16, 2023 - 08:52
Created By: 
Neha Bhoyar
Updated By: 
Neha Bhoyar
Published By: 
Neha Bhoyar
Request Count: 
1
Is Breaking News: 
No