Hanuman Chalisa: हनुमान चालिसा पठणाचे नियम माहिती आहेत का? अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मिळते कृपा

Hanuman Chalisa Effects: रामायण काळापासून सप्तचिरंजीवी असलेले भगवान हनुमान पृथ्वीतलावर अस्तित्वात असल्याचं धर्मशास्त्रात सांगितलं जातं. कलियुगात हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास संकटातून मार्ग निघतो. यासाठी प्रत्येक मंगळवार आणि शनिवारी हनुमान मंदिरात भक्तगण मनोभावे पूजा करतात. काही जण संकट दूर व्हावं यासाठी दररोज सुंदरकांड आणि हनुमान चालीसेचं पठण करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? हनुमान चालिसा पठणाचे काही नियम आहे. जर या नियमांचं पालन केल्यास मारुतिरायचा लवकर आशीर्वाद मिळतो. चला जाणून घेऊयात हनुमान चालिसा पठणाचे नियम काय आहेत

हनुमान चालिसा पठणाची योग्य वेळ कोणती?

हनुमान चालिसा पठण सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी केलं पाहीजे. हनुमान चालिसाचं पठण मंगळवार किंवा शनिवारी केलं पाहीजे. जर ब्रह्ममुहूर्तावर हनुमान चालिसाचं पठण केल्यास शुभ फळ प्राप्ती होते. 

किती वेळा हनुमान चालिसाचं पठण केलं पाहीजे?

हनुमान चालिसेचं पठण आपल्या श्रद्धेनुसार करावं. 7,11,21,40 आणि 108 वेळा करु शकता. हनुमान चालिसेचं पठण मंगळवारी करणं शुभ मानलं जातं.

नियमित पठण केल्याने काय फायदा होतो?

हनुमान चालिसेचं नियमित पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो. नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक उर्जेत वाढ होते. भीती, आजार दूर पळून जातात. आर्थिक, शारीरिक आणि मानसिक समस्येचा नाश होतो. सुख आणि समृद्धी प्राप्त होते. चेहऱ्यावर कायम तेज दिसते.

हनुमान चालिसेचं पठण कसं कराल?

हनुमान चालिसेचं पठण करण्यापूर्वी मारुतिरायाचा फोटो लाल कपड्यावर विराजमान करा. त्यानंतर गाईच्या तुपाचा दिवा लावावा. हनुमान चालिसेचं पठण करताना लाल कपड्याच्या आसनावर बसाव. चांगल्या वातावरणात मन शांत ठेवून हनुमान चालिसेचं पठण करावं. हनुमान चालिसेचं पठण पूर्ण झाल्यावर बुंदीच्या लाडूचा भोग लावावा. हनुमान चालिसेचं पठण केल्याने मंगळदोष, साडेसातीसारख्या दोषांचं निवारण होतं. 

बातमी वाचा- Lal Kitab: आर्थिक अडचणीत लाल किताबमधील तोडगे ठरणार प्रभावी, जाणून घ्या

हनुमान चालिसा

श्रीगुरु चरन सरोज रज निज मनु मुकुरु सुधारि
बरनऊं रघुबर बिमल जसु जो दायकु फल चारि
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौं पवन कुमार
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं हरहु कलेस बिकार

जय हनुमान ज्ञान गुन सागर
जय कपीस तिहुं लोक उजागर
रामदूत अतुलित बल धामा
अंजनि पुत्र पवनसुत नामा

महाबीर बिक्रम बजरंगी
कुमति निवार सुमति के संगी
कंचन बरन बिराज सुबेसा
कानन कुंडल कुंचित केसा

हाथ बज्र औ ध्वजा बिराजै
कांधे मूंज जनेऊ साजै
संकर सुवन केसरीनंदन
तेज प्रताप महा जग बन्दन

विद्यावान गुनी अति चातुर
राम काज करिबे को आतुर
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया
राम लखन सीता मन बसिया

सूक्ष्म रूप धरि सियहिं दिखावा
बिकट रूप धरि लंक जरावा
भीम रूप धरि असुर संहारे
रामचंद्र के काज संवारे

लाय सजीवन लखन जियाये
श्रीरघुबीर हरषि उर लाये
रघुपति कीन्ही बहुत बड़ाई
तुम मम प्रिय भरतहि सम भाई

सहस बदन तुम्हरो जस गावैं
अस कहि श्रीपति कंठ लगावैं
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा
नारद सारद सहित अहीसा

जम कुबेर दिगपाल जहां ते
कबि कोबिद कहि सके कहां ते
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा
राम मिलाय राज पद दीन्हा

तुम्हरो मंत्र बिभीषन माना
लंकेस्वर भए सब जग जाना
जुग सहस्र जोजन पर भानू
लील्यो ताहि मधुर फल जानू

प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं
जलधि लांघि गये अचरज नाहीं
दुर्गम काज जगत के जेते
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते

राम दुआरे तुम रखवारे
होत न आज्ञा बिनु पैसारे
सब सुख लहै तुम्हारी सरना
तुम रक्षक काहू को डर ना

आपन तेज सम्हारो आपै
तीनों लोक हांक तें कांपै
भूत पिसाच निकट नहिं आवै
महाबीर जब नाम सुनावै

नासै रोग हरै सब पीरा
जपत निरंतर हनुमत बीरा
संकट तें हनुमान छुड़ावै
मन क्रम बचन ध्यान जो लावै

सब पर राम तपस्वी राजा
तिन के काज सकल तुम साजा
और मनोरथ जो कोई लावै
सोइ अमित जीवन फल पावै

चारों जुग परताप तुम्हारा
है परसिद्ध जगत उजियारा
साधु संत के तुम रखवारे
असुर निकंदन राम दुलारे

अष्ट सिद्धि नौ निधि के दाता
अस बर दीन जानकी माता
राम रसायन तुम्हरे पासा
सदा रहो रघुपति के दासा

तुम्हरे भजन राम को पावै
जनम-जनम के दुख बिसरावै
अन्तकाल रघुबर पुर जाई
जहां जन्म हरि भक्त कहाई

और देवता चित्त न धरई
हनुमत सेइ सर्ब सुख करई
संकट कटै मिटै सब पीरा
जो सुमिरै हनुमत बलबीरा

जै जै जै हनुमान गोसाईं
कृपा करहु गुरुदेव की नाईं
जो सत बार पाठ कर कोई
छूटहि बंदि महा सुख होई

जो यह पढ़ै हनुमान चालीसा
होय सिद्धि साखी गौरीसा
तुलसीदास सदा हरि चेरा
कीजै नाथ हृदय मंह डेरा

पवन तनय संकट हरन मंगल मूरति रूप
राम लखन सीता सहित हृदय बसहु सुर भूप

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Do you know the rules for reciting Hanuman Chalisa know about it
News Source: 
Home Title: 

Hanuman Chalisa: हनुमान चालिसा पठणाचे नियम माहिती आहेत का? अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मिळते कृपा

Hanuman Chalisa: हनुमान चालिसा पठणाचे नियम माहिती आहेत का? अशा पद्धतीने प्रार्थना केल्यास मिळते कृपा
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
हनुमान चालिसा पठणाचे नियम माहिती आहेत का? अशा पद्धतीने करा प्रार्थना
Publish Later: 
No
Publish At: 
Sunday, January 8, 2023 - 12:52
Request Count: 
1
Is Breaking News: 
No