झी मराठी अवॉर्ड्स २०१८चा दैदिप्यमान सोहळा
झी मराठी अवॉर्ड्स २०१८चा दैदिप्यमान सोहळा
पाहा हे खास फोटो
Dakshata Thasale
| Oct 29, 2018, 13:47 PM IST
झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली की ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी ही वाहिनी घराघरात सुरु होते आणि ‘रात्री जागो मोहन प्यारे’ मालिकेपर्यंत प्रेक्षक मनोभावे हे कार्यक्रम बघतात. ‘लागिरं झालं जी’, 'तुला पाहते रे' असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘माझ्या नव-याची बायको’मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर ‘गाव गाता गजालीची’ मालवणी मंडळी प्रेक्षकांना रोज नव्या नव्या गजाल सांगून त्यांचं मनोरंजन करतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत.
TRENDING NOW
photos