संतुलित आहार - वेळेअभावी तुम्ही जंकफूड किंवा उघड्यावरचे पदार्थ खात असाल तर ही सवय टाळा. अशा पदार्थांंमुळे मेटॅबॉलिझमवर परिणाम होतो. यामुळे तुम्ही अधिक आळशी, सुस्तावलेले आणि आजारी राहता.
आपल्या आरोग्यासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे.दिवसभरात मुबलक प्रमाणात पाणी पिण्याची सवय ठेवा. यामुळे विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असल्यास आरोग्यावर परिणाम होतो.
झोप - आहार आणि व्यायामासोबत पुरेशी झोपही आवश्यक आहे. रात्रीच्या वेळेस शांत झोप मिळणं आवश्यक आहे. अपुर्या झोपेमुळेही आरोग्यावर परिणाम होतो.
व्यायाम - आजारांंना दूर ठेवायचे असेल तर योग्य व्यायाम करणं हा एक उत्तम पर्याय आहे. थकवा दूर ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करा. व्यायामामुळे थकवा आला तरीही त्यामुळे तुम्हांला अधिक उर्जा मिळायला मदत होते.
स्ट्रेचिंंग - ऑफिसमध्ये सतत एकाच ठिकाणी आणि बसून राहिल्याने त्रास होऊ शकतो. यामुळे मसल्स कमजोर होतात. म्हणूनच कामातून वेळ काढून स्ट्रेचिंंग अवश्य करा. यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते.
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.