`मुलं बिघडण्याचे कारण पॉकेटमनी`

www.24taas.com, मुंबई
आई-वडील मुलांना पॉकमनी देत असल्याने मुलं बिघडत आहेत, असे विधान राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी केलंय. पॉकेटमनीच्या नावाखाली जास्त पैसे दिल्याने मुलांचे फावते. त्यामुळे पॉकेटमनी देऊन मुलांना बिघडवू नका, असा सल्ला राज्यपालांनी दिलाय.
लहान मुलांसाठी काम करणाऱ्या ‘चिल्ड्रन क्लब’तर्फे मुलांनी आणि पालकांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी राज्यपालांनी पालकांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिला. मुलांचे आयुष्य घडविण्याच्या नादात त्यांचे लाड केले जातात. पॉकेटमनी दिल्याने आजची मुलं बिघडत आहेत. तुमच्या मुलांनी दहा रुपये मागितले तर त्यांना दोन रुपयेच द्या. पैसे कसे खर्च केले हे विचारा, असा कानमंत्रही राज्यपालांनी दिला आहे.
आपल्या मुलाला भुक लागेल, मुल उपाशी राहिल या प्रेमापोटी आईवडील मुलांना पैसे देतात. मात्र, हा खर्च मुलं ‘एण्टरटेन्मेंट’साठीच होतोय. बस-लोकलचा पास, लायब्ररी फी, खाऊ यासाठी मिळणारा पॉकेटमनी सायबर कॅफेत फेसबुक, ट्विटर आणि कॉम्पुटर गेम्ससाठी हा पॉकेटमनी केव्हा संपतो हेच मुलांना कळत नाही. काही मुली तर शॉपिंगमध्ये आणि पिकनिकवर सगळा पॉकेटमनी संपवतात. महिना संपायच्या आतच ही मुले पैशासाठी पुन्हा हात पसरत असल्याने एवढ्या पैशांचे केले काय, असा सवाल घराघरातील पालक आपल्या मुलांना विचारू लागले आहेत.
पॉकेटमनी मोबाईल रिचार्जवरही अर्ध्याहून अधिक खर्ची होतो. हल्ली मोबाईलवर ऑनलाइन चॅटिंगही करता येत असल्यामुळे त्याचा खर्च खूप आहे. दरम्यान, अभ्यासाच्या व्यापातून थोडे रिलॅक्स होण्यासाठी एंटरटेन्मेंट हवेच. फक्त त्यावर किती पैसे खर्च करावे याचे तारतम्य मुलांनी राखायला हवे. एखाद्या प्रोजेक्टची माहिती मिळविण्यासाठी सायबर कॅफेत गेल्यावर थोडावेळ फेसबुकवर ऑनलाइन राहिल्यास त्यात बिघडलं कुठे?, अशा तरूणाईंकडून प्रतिक्रिया येत आहेत.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Pocket Money
Home Title: 

`मुलं बिघडण्याचे कारण पॉकेटमनी`

No
155983
No
Authored By: 
Surendra Gangan