सायन हॉस्पिटलमध्ये मिठाईतून 40 डॉक्टरांनाच विषबाधा
मुंबई : सायन इथल्या पालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात कॅन्टीनमधील मिठाई खाल्यानं ४० डॉक्टरांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडलीय. यातील 36 डॉक्टरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी कोणाच्याही जीवाला धोका नसल्याचं सांगण्यात आलंय.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं वाटण्यात येणारी मिठाई खाल्ल्यानं मुंबईतील 40 डॉक्टरांना ही विषबाधा झाली आहे. ध्वजारोहन झाल्यानंतर डॉक्टरांसाठी मिठाई मागवण्यात आली होती. मिठाई खाल्यानंतर पोटात ढवळू लागल्यानं तसंच उलट्या झाल्यानं तातडीनं या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, याप्रकरणी कॅन्टीनचालकावर कारवाई केली जाणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
In Sion Hospital 40 doctors poisoning
News Source:
Home Title:
सायन हॉस्पिटलमध्ये मिठाईतून 40 डॉक्टरांनाच विषबाधा

Yes
No
Section: