मनसे नगरसेवक संतोष तुर्डेंवर जीवघेणा हल्ला

मुंबई : मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 166मधून निवडून आलेल्या मनसे नगरसेवक संतोष तुर्डे यांच्यावर रात्री जीवघेणा हल्ला झाला. या हल्लयात तुर्डे आणि त्यांचे तीन कार्यकर्ते जखमी झालेत.  

हा हल्ला प्रभागातल्या भाजपच्या नेत्यानं केल्याचा आरोप तुर्डेंच्या कुटुंबियांनी केलाय. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून तपास सुरू केलाय. काल रात्री याप्रकरणी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आलं होतं.  

रात्री साडे दहाच्या सुमारास तुर्डेंच्या घराबाहेर जल्लोष सुरू होता. त्याचवेळी भाजपचे उमेदवार सुधीर खातू आणि त्यांचे समर्थकांना तुर्डे आणि त्यांच्या सहका-यांवर हल्ला चढवला, असा तुर्डे कुटुंबियांचा आरोप आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
mns corporator santosh turde attacked
News Source: 
Home Title: 

मनसे नगरसेवक संतोष तुर्डेंवर जीवघेणा हल्ला

मनसे नगरसेवक संतोष तुर्डेंवर जीवघेणा हल्ला
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes