डॉ. उदय निरगुडकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

मुंबई : पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांना सोमवारी मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणा-या पुरस्कारांचं वितरण सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडलं.

उत्कृष्ट चित्रपट निर्मितीसाठी सिने अभिनेते आमीर खान, प्रदीर्घ हिंदी चित्रपट सेवेबद्दल अभिनेत्री वैजयंती माला, प्रदीर्घ नाट्य सेवेबद्दल अभिनेत्री आशालता, प्रदीर्घ क्रीडा सेवेबद्दल माजी क्रिकेटपटू कपिल देव, अमर फोटो स्टुडिओ नाटकाचे निर्माते सुनील बर्वे आणि प्रदीर्घ संगीत सेवेबद्दल गायिका कौशकी चक्रवर्ती यांना देखील यावेळी पुरस्कार देण्यात आले.

गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत षण्मुखानंद सभागृहात हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Dr Uday Nirgudkar gets master dinanath mangeshkar award
News Source: 
Home Title: 

डॉ. उदय निरगुडकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

डॉ. उदय निरगुडकर यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes