शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन

www.24taas.com, मुंबई
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आज सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखो शिवसैनिक आणि चाहत्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांना साश्रू नयनांनी अंतिम निरोप देण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. यावेळी शिवाजी पार्कवर अतिशय भावूक वातावरण झाले होते. लाखो चाहत्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्ह्ते. शिवतीर्थावर ते त्यांची राजकीय कारकिर्द तेजस्वी सूर्याप्रमाणे प्रखर झाली, तेथेच ते आज अनंतात विलीन झाले.

यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आपले अश्रू अनावर झाले. ते अंत्यविधी सुरू असताना ढसाढसा रडत होते. त्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांच्या अश्रूच्या अखंडा धारा वाहत होत्या.

LIVE घडामोडी :

सायंकाळी ६.१५ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार
सायंकाळी ५.५५ पोलिसांनी बाळासाहेबांना दिली मानवंदना
सायंकाळी ५.४० उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलं बाळासाहेबांचं अंतिम दर्शन
सायंकाळी ५.२० उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचं घेतलं अंतिम दर्शन... उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं केलं सांत्वन
दुपारी ४.५० राज ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल... शिवाजी पार्कवर लोटली अभूतपूर्व गर्दी...
दुपारी ४.०० वाजेपर्यंत एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा, संजीव नाईक, स्मृती इराणी, दत्ता मेघे, गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ, महेश मांजरेकर, सुधीर मुनगंटीवार, प्रकाश जावडेकर, मनोहर नाईक, राम नाईक, अमित देशमुख, मनोहर जोशी, अनंत तरे, बाळा नांदगावकर, राजीव शुक्ला, जितेंद्र आव्हाड वेणुगोपाल धूत यांबरोबरच मराठी अभिनेते नाना पाटेकर, रमेश भाटकर, रितेश देशमुख, मिलींद गुणाजी, मधुर भांडारकर हेही उपस्थित झाले.
दुपारी ४.१५ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रीया सुळे, विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, सुषमा स्वराज, अरुण जेटली, लालकृष्ण अडवानी, मनेका गांधी, प्रफुल्ल पटेल शिवाजी पार्कवर दाखल
दुपारी ४.०० अमिताभ बच्चन, जया बच्चन, उद्योगपती अनिल अंबानी शिवाजी पार्कवर दाखल
दुपारी ३.३० शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव सेना भवनाच्या आत नेलं गेलं. महायात्रेची वाट पाहत सेना भवनाच्या दाराशी ताटकळत बसलेले शिवसैनिक बाळासाहेबांच्या शेवटच्या दर्शनासाठी आतूर झाले होते.
दुपारी ३.०० महायात्रा शिवसेना भवन परिसरात दाखल... बाळासाहेबांना निरोप देण्यासाठी उपस्थितांची एकच गर्दी झाली होती. आणि याच वेळेस राज ठाकरे शिवसेना भवनात जाणं टाळण्यासाठी कृष्णकुंजवर रवाना झाले.
दुपारी २.०० बाळासाहेबांचं पार्थिव शितलादेवी परिसरात परिसरात दाखल...
सकाळी १२.०० महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे हे शिवसैनिकांसोबत पायी चालत महायात्रेत झाले सहभागी.
सकाळी ११.४५ शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या अंतिमविधीसाठी तयारी करत असलेले नितीन चंद्रकांत देसाई यांनी केली व्यवस्थेची पाहणी
सकाळी १०.१५ लाखो शिवसैनिकांसह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची महायात्रा माहिम परिसरात दाखल
सकाळी १०.०० इतका वेळ आपल्या वडिलांना आधार देणाऱ्या आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनाही आपले अश्रू आवरणं कठीण झालं. उद्धव ठाकरेंबरोबर संपूर्ण कुटुंबच भावनाविवश झालं.
सकाळी ९.४५ ठिकठिकाणाहून शिवसैनिक महायात्रेत सहभागी होत गेले... प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दिसत होते.
सकाळी ९.२५ - महायात्रेची मातोश्रीहून सेनाभवनाकडे आगेकूच
सकाळी ९.२० - बाळासाहेब ठाकरे यांना पोलिसांनी दिली मानवंदना
सकाळी ९.१६ - शासकीय इतमामात होणार बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार... बाळासाहेबांचं पार्थिवावर 'तिरंगा' चढवण्यात आला.
सकाळी ९.१० - ... अखेर बाळासाहेबांच्या लाडक्या 'डिंगा'चा (उद्धवचा) बांध फुटला आणि बाळासाहेबांना खांदा देताना त्यांना रडू आवरता आलं नाही.
सकाळी ९.०० - लाखो शिवसैनिकांच्या महासागरात महायात्रेला सुरूवात
सकाळी ८.०० ->

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
balasaheb thackeray funeral
Home Title: 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन

No
155418
No
Authored By: 
Shubhangi Palve