घ्या बाळासाहेबांच्या अस्थींचे अंतिम दर्शन...

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या अस्थींचे विसर्जन गंगा, गोदावरी या पवित्र नद्या तसेच हरिहरेश्‍वर वगैरे पवित्र ठिकाणी करण्यात येणार आहे. या अस्थींचे दोन रौप्यकलशांत संचयन करण्यात आले असून त्यातील एक कलश मातोश्री निवासस्थानी, तर दुसरा शिवसेना भवन येथे ठेवण्यात आला आहे.
२० नोव्हेंबर - अस्थिकलशाचे वितरण दुपारी १२ वाजता शिवसेना भवन येथून करण्यात येईल. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख तसेच हिंदुस्थानातील सर्व राज्यांच्या प्रमुखांकडे हे अस्थिकलश सोपविले जातील.
२१/२२ नोव्हेंबर - मुंबई-महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयांमध्ये या अस्थिकलशाचे दर्शन शिवसेनाप्रेमींना घेता येईल.
२३ नोव्हेंबर - मुंबई-महाराष्ट्रासह हिंदुस्थानातील हरिहरेश्‍वर, नाशिक, हरिद्वार, काशी, कन्याकुमारी आदी ठिकाणच्या प्रमुख नद्यांमध्ये अस्थिविसर्जन होईल.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Balasaheb funeral
Home Title: 

घ्या बाळासाहेबांच्या अस्थींचे अंतिम दर्शन...

No
155441
No