राष्ट्रवादीचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या पोलीस चौकशीचे आदेश

मुंबई: लेटरहेडचा गैरवापर करून काम केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहुल नार्वेकर यांची पोलीस चौकशी करण्याचे आदेश मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. आमदार राहुल नार्वेकर, त्यांच्या वहिनी नगरसेविका हर्षिता नार्वेकर आणि भाऊ मकरंद नार्वेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आलीय. लेटरहेडवर खोट्या सह्या करून कामं करून घेतल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. 

सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. लेटरहेडवरील सह्यांची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. राहुल नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तर त्यांची वहिनी हर्षिता या वॉर्ड क्रमांक २२६ च्या नगरसेविका आहेत. तर भाऊ मकरंद नार्वेकर वॉर्ड २२७ चे नगरसेवक आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
NCP MLA Rahul Narvekar will be police inquiry
News Source: 
Home Title: 

राष्ट्रवादीचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या पोलीस चौकशीचे आदेश

राष्ट्रवादीचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या पोलीस चौकशीचे आदेश
No
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
राष्ट्रवादीचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या पोलीस चौकशीचे आदेश