… म्हणून अंगावरील कपडे काढले, तिने केला हा खुलासा

मुंबई : अंधेरीमधल्या ओशिवरा पोलीस ठाणे हद्दीतल्या एका उच्चभ्रू वसाहतीत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. एका तरुणीने अंगावरील कपडे काढून धिंगाणा घातला होता. एका मॉडेलने दारूच्या नशेत अंगावरचे कपडे काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांसमोर तिने हा सर्व लज्जास्पद प्रकार केला होता. तिचा अवतार पाहून पोलीस आल्या माघारी निघून गेले होते. मात्र, त्यामागील स्टोरी तिने स्वत: पुढे येऊन सांगितली आहे.

नेमकं त्या रात्री झालं काय? या तरुणीला सिगरेट हवी होती. त्यासाठी तिने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सिगरेट आणायला सांगितलं. परंतु त्याने मी ड्यूटीवर असल्याने जाणार नाही असे उत्तर दिले. मी त्याला दुसऱ्या वॉचमनला सिगारेट आणून दे असे बोलण्यास सांगितले, परंतु त्याने नकार दिला. त्यानंतर त्याने एका सिगारेट वाल्याचा मला नंबर दिला आणि फोन करण्यास सांगितले. परंतु रात्र जास्त झाल्याने मी त्याला फोन न करता स्वत: सिगारेट आणण्यासाठी गेले. बाहेर तीन-चार वॉचमन असतानाही मला सिगारेट आणण्यासाठी जावे लागले. मी त्यांना याबाबत सुनावल्यावर त्याने अपशब्द वापरले आणि ‘चारित्र्यहीन मुलगी’असा माझा उल्लेख केला.

व्हिडिओ : पोलिसांसमोरच तरुणीनं कपडे काढले

सिगारेटच्या घटनेनंतर वॉचमनने पोलिसांना फोन केला. पोलीस मला रात्रीच्या अडीच वाजता नेण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत महिला पोलीसही नव्हती. या सर्व गोंधळात काय करावे मला सूचले नाही, असे मॉडेलने सांगितले. त्यांना विरोध करण्यासाठी मी माझा नाईट ड्रेस काढला आणि तुमच्या सोबत येणार नाही असं सांगितलं. तेव्हा पोलीस निघून गेले, असेही तिने सांगितले. ते माझ्यावर बलात्कार करणार नाही ना किंवा माझी हत्या करणार नाही ना? या भीतीने आणि मी माझ्या अंगावरचे कपडे काढले, असेही मॉडेलने सांगितले.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Model tells the story of that night when she strips in elevator towards cops
News Source: 
Home Title: 

… म्हणून अंगावरील कपडे काढले, तिने केला हा खुलासा

… म्हणून अंगावरील कपडे काढले, तिने केला हा खुलासा
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
… म्हणून अंगावरील कपडे काढले, तिने केला हा खुलासा
Publish Later: 
No
Publish At: 
Wednesday, October 31, 2018 - 18:04