महाराष्ट्राच्या पाच खासदारांना 'संसदरत्न'
नवी दिल्ली: संसदेमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या खासदारांना देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार घोषीत झाला आहे. या पुरस्कारांसाठी सात खासदारांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सातपैकी पाच खासदार हे महाराष्ट्राचे आहेत. प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि आयआयटी चेन्नई यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी आठ वेळा हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोण आहे ते खासदार?
'संसदरत्न' पुरस्काराचे मानकरी झालेल्या पाच खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, धनंजय महाडिक, काँग्रेसचे राजीव सातव, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आणि भाजपाच्या हिना गावित यांचा समावेश आहे. 'संसदरत्न' पुरस्कारासाठी खासदारांची संसदेतील उपस्थिती, त्याने विचारलेले प्रश्न, विविध विषयांवर केलेली अभ्यासपूर्ण भाषणं, विचारलेल्या प्रश्नांची संख्या, सभागृहासमोर मांडलेली खासगी विधेयके आदी गोष्टींचा विचार केला जातो.
संसदेत कोणत्या खासदाराची कामगिरी किती?
सुप्रिया सुळे
- ७४ चर्चांमध्ये सहभाग
- १६ खासगी विधेयकं सादर केली
- ९८३ प्रश्न उपस्थित केले
- सभागृहातील एकूण उपस्थिती ९८ टक्के
श्रीरंग बारणे
- १०२ चर्चांमध्ये सहभाग
- १६ खासगी विधेयकं सादर
- ९३२ प्रश्न उपस्थित केले.
- सभागृहातील एकूण उपस्थिती ९४ टक्के
राजीव सातव
- ९७ चर्चांमध्ये सहभाग
- १५ खासगी विधेयकं सादर केली
- एकूण ९१९ प्रश्न उपस्थित केले.
- सभागृहातील एकूम उपस्थिती ८१ टक्के
धनंजय महाडिक
- ४० चर्चांमध्ये सहभाग घेतला
- एक खासगी विधेयक सादर केले.
- एकूण ९७० प्रश्न उपस्थित केले.
- सभागृहातील उपस्थिती ७४ टक्के
हिना गावित
- १५१ चर्चांमध्ये सहभाग घेतला
- २१ खासगी विधेयकं सादर केली
- ४६१ प्रश्न उपस्थित केले
- सभागृहातील एकूण उपस्थिती ८२ टक्के
महाराष्ट्राच्या पाच खासदारांना 'संसदरत्न'
