अबू सालेमला फाशी का नाही, सांगताहेत उज्ज्वल निकम...

मुंबई :  मुंबईच्या विशेष टाडा  कोर्टाने गुरूवारी मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणी पाच दोषींना शिक्षा सुनावली. यावेळी सर्वांची नजर अबू सालेमला मिळणाऱ्या शिक्षेवर होती. अबू सालेमला कोर्टाने जन्मठेप तसेच दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. 

अबू सालेमला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली नाही, याचे कारण सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. 

उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, अबू सालेमच्या शिक्षेसंदर्भात भारत आणि पुर्तगाल सरकारमध्ये निश्चित करण्यात आले की पोर्तुगालच्या कायद्यानुसार त्याला २५ वर्षांपर्यंतच जन्मठेप देण्यात यावी. त्यांच्याकडे जन्मठेपेची मुदत २५ वर्ष आहे. त्यामुळे वर्तमान स्थितीत अबू सालेमला १३ वर्षांचा अजून तुरूंगवास भोगावा लागणार आहे. त्याने आतापर्यंत १२ वर्षांचा तुरूंगवास भोगला आहे. 

अबू सालेमचे २००५ मध्ये प्रत्यार्पण झाले, त्यावेळी भारताचे तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी लिखीत स्वरूपात पोर्तुगाल सरकार आणि कोर्टाला आश्वासन दिले होते. यात अबू सालेमला २५ वर्षांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये ठेवण्यात येणार नाही. तसेच त्याला फाशीची शिक्षाही देण्यात येणार नाही. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
know-why-abu-salem-escaped-death-sentence-according-to-ujjwal-nikam
News Source: 
Home Title: 

अबू सालेमला फाशी का नाही, सांगताहेत उज्ज्वल निकम...

 अबू सालेमला फाशी का नाही, सांगताहेत उज्ज्वल निकम...
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes