ड्रग्ज पार्टीतून 10 जणांना पकडले, मात्र सोडून देण्यात आलेल्यांमध्ये भाजप नेत्याचा मेहुणा - नवाब मलिक

दीपक भातुसे / मुंबई : Nawab Malik on Drug Party : एनसीबीने (NCB) ड्रग्ज पार्टीतून (drug party) 10 लोकांना पकडले होते. मात्र, त्यातील दोघांना सोडून देण्यात आले आहे. सोडून देण्यात आलेल्यांमध्ये भाजप (BJP) नेत्याचा मेहुणा, आहे असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. (10 arrested from drug party, but BJP leader's brother-in-law among those released - Nawab Malik)

एनसीबीने क्रूझवरून दहा लोकांना पकडले होते. मात्र त्यातील दोन लोकांना सोडून देण्यात आले. यात एका भाजप नेत्यांचा मेव्हणा होता, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिला होता की 8 ते 10 लोकांना पकडले आहे. त्यावेळी मी प्रश्न विचारले होते एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय, तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो. जर 10 लोकांना पकडले असेल तर कदाचित दोन लोकांना सोडलं असेल. आता हे खरे असल्याचं समोर आले आहे. जी दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपचे एका नेत्याचा मेहुणा त्यामध्ये होता. त्याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

ड्रग्ज पार्टीतून त्या दोन व्यक्तींना आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. हा सगळा प्रकार समोर येईल म्ह्णून त्यांना सोडण्यात आले आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. भाजपचा कोण नेता आहे, त्याचे नाव उद्या मी घोषित करणार आहे. आज इतकंच सांगेल की तो हायप्रोफाईल नेता आहे. त्यानेच सगळं गॉसिप केलं आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

पहिल्यांदा म्हटले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे. त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा, असा माझा सवाल आहे. त्यांना याच उत्तर द्यावंचं लागेल. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह देखील जनेतचा सेवक होते.- शर्मा पण जनतेचे सेवक होते. परंतु देशसेवा न करता हे दुसरे धंदे करत होते. हा व्यक्ती देखील त्यातील आहे. हळूहळू मी सगळं याचा खुलासा करणार आहे, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.

कलाकारांकडून यांनी पैसे घेतले. दोन ग्राम चार ग्रॅमसाठी पैसे घेतले. त्यांच्या पेक्षा आमच्या नार्कोटिकस विभागणे काल दिवसभरात मोठ्या कारवाया केल्या 20 किलो ड्रग्ज पकडले आहे. त्यांची कामे आमचा विभाग करतो आहे. जसजसे पुरावे हातात लागतील तसं तसं यांची पोलखोल करणार आहे, असे नवाब मलिक म्हणाले.

अजित पवार यांच्या नातेवाईकांवर कारवाई 

उपमुख्यमंत्री अजितदादांवर कारवाई होत आहे. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, ते या प्रकरणात अगोदर खुलासे मागू शकले असते. परंतु त्यांनी तसे न करता केवळ बदनामी करण्याचा प्रकार केला आहे. अशा प्रकारच्या कारवाई विरोधात कोर्टात जाणार आहोत. आम्ही नेते कुणाला घाबरणार नाहीत. महाराष्ट्राची जनता सगळं पाहत आहेत. भ्रष्ट्राचार मुक्त करणे म्हणजे भाजपच्या गंगेत डुबक्या मारणे असं आहे का?, असा सवाल मलिक यांनी यावेळी उपस्थित केला.

आता जे भाजपमध्ये गेले त्यांनी भाजपच्या गंगेत डुबकी मारली आहे. भाजपच्या काही आजी माजी मंत्र्यांनी बऱ्याच बँका बुडावल्या आहेत. त्यांची प्रकरणे देखील आम्ही बाहेर काढणार आहोत. नुसते आम्ही आरोप करत बसत नाही, पुराव्यासकट आम्ही आरोप करणार आहोत. काही बाहेरचे हायप्रोफाईल लोकं हे सगळं प्रकरण हँडल करत आहेत, असा आरोप करताना हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Drug Party : 10 arrested from drug party, but BJP leader's brother-in-law among those released - Nawab Malik
News Source: 
Home Title: 

ड्रग्ज पार्टी : सोडून देण्यात आलेल्यांमध्ये भाजप नेत्याचा मेहुणा - नवाब मलिक 

ड्रग्ज पार्टीतून 10 जणांना पकडले, मात्र सोडून देण्यात आलेल्यांमध्ये भाजप नेत्याचा मेहुणा - नवाब मलिक
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
ड्रग्ज पार्टी : सोडून देण्यात आलेल्यांमध्ये भाजप नेत्याचा मेहुणा - नवाब मलिक
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, October 8, 2021 - 11:27
Request Count: 
1
Is Breaking News: 
No